विद्युतचा शॉक लागून तमाशा मंडळातील दोन कामगारांचा मृत्यू !

96

मोताळा तालुक्यातील पान्हेरा (खेडी) येथील दुदैवी घटना

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा- (22 NOV. 2023) तालुक्यातील पान्हेरा(खेडी) कान्हु सतीमाता मंदीर आहे. येथे दरवर्षी मोठी यात्रा भरते, यावर्षी यात्रेस 21 नाव्हेंबरपासून सुरुवात झाली. आज बुधवार 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास ‘आनंद लोकनाट्य तमाशा’ मंडळाचे फडातील कामगार सामान खाली उतरवित असतांना त्यांना विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने यामध्ये दोन युवकांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतक युवकांचे नाव अंकुश वारुळे व विशाल भोसले असे असल्याची माहिती समोर आली आहे.

मोताळा तालुक्यातील पान्हेरा(खेडी) येथे बेलदार समाजबांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या कान्हु सतीमाता मंदीर आहे. महाराष्ट्राभरातील हजारो भाविक व समाजबांधव दरवर्षी येथील यात्रेत हजेरी लावतात. यावर्षी कान्हु सतिमाता देवीच्या यात्रेस 21 नोव्हेंपासून सुरुवात झाली असून तिची 24 नोव्हेंबर रोजी बारसच्या दिवशी महाप्रसादाचे वितरण करुन सांगता करण्यात येणार आहे. आज 22 नाव्हेंबर रोजी ‘आनंद लोकनाट्य तमाशा’ मंडळ आपला फड घेवून एका ट्रकमध्ये आले होते. त्यामधील सामान खाली काढतांना दोन कामगार युवकांच्या हातातील लोखंडी पाईपाचा बाजुला असलेल्या मुख्य तारेला स्पर्श झाल्याने यामध्ये अंकुश वारुळे (वय 35)रा.नारायणगाव पुणे व विशाल भोसले (वय 33) रा.राजूर गणपती हे गंभीर जखमी त्यांना रुग्णवाहिकेने धा.बढे येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते, परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

9 वर्षापासून मोताळ्यात तमाशा नाही

मोताळ्यात दरवर्षी दिवाळी झाल्यानंतर अनेक तमाशा मंडळ आपला फड लावत होते. परंतु  8 ते 9 वर्षापूर्वी बोराखेडी पोस्टे.तत्कालीन पोलिस निरिक्षक महल्ले यांनी सुरक्षेचे कारण पुढे करीत परवानगी नाकारल्याने मोताळ्यामध्ये परत लोकनाट्य तमाशा मंडळाने हजेरी लावली नाही. त्यावेळी नागरिक व तमाशा मंडळाने तीव्र नाराजी व्यक्त करीत ठाणेदार महल्ले यांचा निषेध व्यक्त केला होता.