चोरट्यांपेक्षा बोराखेडी पोलिसांचे नेटवर्क ‘पावरफुल्ल’! ‘त्या’ ज्वेलर्स मालकाला लुटणाऱ्या चोरट्यांना केले 48 तासात गजाआड !!

51

मोताळा: तालुक्यातील बोराखेडी-वडगाव रोडवर 22 जूनच्या सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास चार चोरट्यांनी पुन्हई शिवारातील सुनिल गर्दे यांच्या शेताजवळ वडगाव येथील मोताळा येथील विजय ज्वेलर्सचे मालक राजेंद्र वाघ यांचे सोन्या-चांदीचे दागिणे लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, झटापटी होवून चाकू हल्ल्यात वाघ जखमी झाले होते. ‘त्या’ दरोडेखोरांना पकडणे पोलिसासमोर मोठे आव्हान होते. बोराखेडी पोलिसांनी तपासचक्रे फिरवीत दरोडा प्रकरणातील दोघांना 48 तासाच्या आत गजाआड करीत ‘कानून के हात बहोत लंबे होते है’ चा प्रत्येय दिला आहे.

तालुक्यातील वडगाव (खं) येथील राजेंद्र दुर्योधन वाघ यांचे मोताळा येथील आठवडी बाजारात विजय ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. ते 22 जून रोजी सायंकाळी पाच वाजता ते मोताळा येथून दुचाकीने वडगाव येथे जाण्यासाठी निघाले असता, पुन्हई शिवारात गर्दे यांच्या शेताजवळ त्यांच्यासमोर एक दुचाकी येवून दुचाकीवरील दोघांनी त्यांच्या जवळील सोन्या-चांदीच्या दागिण्यांची बॅग हिसकविण्याचा प्रयत्न केला. काहीवेळाने दुसरी दुचाकी आली त्यातून दोघेजण उतरले त्यांनी राजेंद्र वाघ यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्यांच्याजवळील दागिण्याची बॅग हिसकण्याचा प्रयत्न केला होता, मात्र वाघ यांनी बॅग सोडली नाही. झटापटीमध्ये चोरट्यांनी त्यांच्या मानेवार चाकू हल्ला केल्याने वाघ जखमी झाले होते. राजेंद्र वाघ यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी चार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरिक्षक सारंग नवलकार घटनेचे गांर्भीर्य पाहता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करुन गुप्त माहितीवरुन महेश लक्ष्मण चव्हाण रा.इंदिरा नगर मोताळा, सुपडू शहा शकुर शाह रा.वृंदावन नगर मोताळा, रितेश नवलसिंग गांगुर्डे रा.रामगाव तांडा यांना ताब्यात घेवून पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी त्यांच्या दोन मित्रासोबत राजेंद्र वाघ यांना मारहाण करुन दागिणे लुटण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. बोराखेडी पोलिसांनी 48 तासात घटनेचा तपास करुन दोघांना अटक करुन पोलिसांचे नेटवर्क पावरफुल्ल असल्याचे दाखवून दिले.

यांच्या पथकाने केली कारवाई

लुटमारी प्रकरणातील चार दरोडेखोरांना पकडणे बोराखेडी पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते. ते आव्हान पोलिसांनी पेलत चोरट्यांना 48 तासात दोघांना अटक केली. सदर कारवाई पोलिस निरीक्षक सारंग नवलकार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय.विजयकुमार घुले, एएसआय. मधुकर महाजन, यशवंत तायडे, हेकाँ.नंदकिशोर धांडे, दिपक पवार, अमोल खराडे, विजय पैठणे, रमेश नरोटे, प्रमोद साळोक, गणेश बरडे, सुनिल भवटे यांच्या पथकाने केली.