Wednesday, May 20, 2026
Home Breaking News महिलेच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन

महिलेच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन

53

बुलढाणा: पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामीण येथून अनोळखी महिलेला दिव्या फाँडेशन बुलढाणा यांच्याकडून अपघात विभाग जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथे उपचारासाठी 12 जानेवारी रोजी भरती करण्यात आले. उपचारा दरम्यान तीचा मृत्यू झाला. या मृत महिलेला ओळखणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

अनोळखी महिलेचे वय 65 ते 68 वर्ष, उंची 160 सेमी, बांधा सळपातळ, सावळा रंग, डोक्याची केस पांढरे, अंगात लाल व पांढऱ्या रंगाचा गाऊन व कपाळावर मध्यभागी टिकली गोंदलेले दिसत आहे. या वर्णनाचा महिलेचा कोणी नातेवाईक किंवा मित्रमंडळी ओळखत असल्यास पोलीस स्टेशन, बुलढाणा(ग्रामीण) येथे किंवा तपास अधिकारी मो.9823717180 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Don`t copy text!