मोताळा : तालुक्यातील कोथळी येथे दरवर्षी प्रमाणे राम नवमी उत्सवाच्या निमित्ताने २३ ते ३० मार्च दरम्यान श्रीमद् भागवत कथा तसेच अखंड नामसंकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचे हे ४५ वे वर्ष आहे. कथावाचन हभप. वासुदेव महाराज येसोने,सावळा (संग्रामपूर) हे करणार आहेत.
दैनंदिन कार्यक्रम सकाळी ५ वाजता काकडा आरती, ७ वाजता विष्णु सहस्त्रनाम, सकाळी ९ते १२ व दुपारी ३ते ५ कथा, सायंकाळी ६ वाजता हरिपाठ व रात्री ८ ते १० दरम्यान हभप.पंढरीनाथ महाराज वाघ कोर्हाळा, हभप.विकास लाहुळकर आळंदी, बालकिर्तनकार हभप.कृष्णा तायडे मुक्ताईनगर, हभप.गणेश घोंगे गाडेगाव,हभप. कु.साक्षीदीदी सिसोद जामनेर, हभप.गणेश साठे कोथळी, हभप. ज्ञानेश्वर पातोंड अकोट यांचे किर्तन आयोजीत करण्यात आले आहे. ३० मार्च रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत हभप. वासुदेव येसोने यांचे काल्याचे किर्तन व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे. सांयकाळी गावातून दिंडी मिरवणूक काढून सप्ताहाची सांगता होणार आहे.


























