बुलढाणा: वंचित बहुजन आघाडीने माजी आमदार विजयराज शिंदे व विद्यमान आमदार संजय गायकवाड या दोघांनी एकमेकांवर केलेल्या शाब्दीक भांडणात वंचित बहुजन आघाडीने हनुमान उडी घेत आजी व माजी आमदारांना जिल्ह्यातून तडीपार करण्याची मागणी आज शुक्रवार 17 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. त्याला कारण काय होते, ते बातमीत सविस्तर..
वंचितच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, आमदार संजय गायकवाड यांनी माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यामध्ये सध्या वैयक्तीक राजकारणाच्या पोटी आरोप प्रत्यारोप प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर सुरु आहेत. आ.गायकवाड यांनी विजयराज शिंदे यांच्यावर खूप मोठा गंभीर आरोप केला की, विजयराज शिंदे हे त्यांच्या एका आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण करतात, यासर्व घटनाकर्माचे त्यांच्याकडे पुरावे आहेत, परंतु त्या आदिवासी आश्रम शाळेतील मुलींची बदनामी होईल यासाठी मी सदर प्रकरण चौकशी करत नाही. असे वक्तव्य करुन आ.गायकवाड यांनी ‘त्या’ आदिवासी आश्रम शाळेतील आजी,माजी विद्यार्थिनीची चारीत्राची बदनामी केल्याचा आरोप वंचितने निवेदनात करीत सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन कारवाई करण्यात यावी, जेणेकरुन कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होणार नाही.
विद्यमान व माजी आमदार यांच्या या बेताल वक्तव्यामुळे राजमाता माँ जिजाऊचे माहेरघर असलेला बुलढाणा जिल्ह्याची बदनामी होत असून सामाजिक व राजकीय वातावरण वैचारिकदृष्ट्या गढुळ होऊन जनतेमध्ये रोष निर्माण झाल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले असून या दोघांवरही गंभीर स्वरुपाचे गुन्हे सुध्दा दाखल न्यायप्रविष्ट आहेत. सदर प्रकरणाची चौकशी होईपर्यंत विद्यमान आमदार व माजी आमदार यांच्याविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम, कलम ५६/५७ अन्वये तात्काळ तडीपारीची कार्यवाही करावी, जेणेकरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
सध्या उन्हाळ्याचे कडक उन आहे, त्यातच माजी व विद्यमान आमदारांवर कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने घेतलेला आक्रमक पवित्रावर जिल्हा प्रशासन काय कारवाई करते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
अन्यथा वंचित आंदोलन छेडेल!
सदर प्रकरणात तातळीने चौकशीचे आदेश देण्यात यावे, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला. निवेदन देतांना वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, ADV.अमर इंगळे,शेषराव मोरे,तालुकाध्यक्ष मनोज खरात,समाधान डोंगरे,संजय धुरंधर,दिलीप वाकोडे,दिलीप वाकोडे,अनिल जाधव,रविभाऊ खराटे,अशोक सरदार,महेन्द्र पन्हाळ,संजय जाधव,यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.


























