Monday, April 20, 2026
Home Buldana गॅस सिलेंडरसाठी वंचित आक्रमक; कलेक्टरच्या कार्यालयासमोर पेटविली चूल! गॅस मिळाला नाहीतर जिल्हाधिकारी...

गॅस सिलेंडरसाठी वंचित आक्रमक; कलेक्टरच्या कार्यालयासमोर पेटविली चूल! गॅस मिळाला नाहीतर जिल्हाधिकारी कार्यालयचं पेटवून देवू-निलेश जाधव

17

बुलढाण्यात ‘नरेंदर कब मिलेंगा सिलेंडर’? चा नारा गुंजला !

बुलढाणा- गॅस सिलेंडरसाठी होणारी कृत्रिम टंचाई थांबवावी, गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखावा, 25 दिवसांनंतर गॅस मिळेल ही अट शिथिल करण्यासह आदी न्याय्य मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आंदोलन करीत आज सोमवार 6 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून कांदोपोहे बनवून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील गॅस ची कृतीम टंचाई दूर करुन गॅसचा काळा बाजार सुरु थांबवून कॅटरींग धारक व छोटे-मोठे हॅाटले तसेच सर्व सामान जनतेला गॅस मिळण्यासाठी वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडण्यात आले. यावेळी जाधव यांनी गॅस मिळाला नाहीतर जिल्हाधिकारी कार्यालय पेटवून देण्याचा इशारा जिल्हाप्रशासनास दिला आहे.

राज्यभरात सुरू असलेली गॅस टंचाई, गॅस कमतरतेमुळे दैनंदिन जीवनावर झालेल्या परिणाम झालेला आहे. ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ ह्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासन, शासनाचे आमच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गॅस टंचाई आणि दैनंदिन जीवन, रोजीरोटी, रोजगारावर झालेल्या परिणामाबद्दल सरकारकचे लक्ष वेधण्यासाठी वंचितचे राष्ट्रीय नेते Adv.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आल्याचे निलेश जाधव यांनी सांगत काही दिवसांपूर्वी अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाठ हे गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी 5 तास उन्हात रांगेत उभे होते, त्यातच रांगेत उभे असतांना तर अमरावती येथे तरुणाचा गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी दुर्दैवी मृत्यू झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतांना वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, बुलढाणा तालुकाध्यक्ष मनोज खरात,विशाल गवई युवा जिल्हाअध्यक्ष, समाधान डोंगरे,भिमराव शिरसाठ,शेषराव मोरे,विलास प्रधान,संजय खराटे,अनिल जाधव,श्रीकृष्ण खरात,रमेश खरात,अरुण खरात,गजानन खरात,देवलाल मांडवे,रमेश मांडवे,कृष्णा बनकर,मिलिंद वानखेडे,नामदेव अवसरमोल,तुकाराम रावळकर,कोंडू रामेकर,कलाबाई सुरोशे,बाळासाहेब गवई पुरषोत्तम वाकोडकर,दिलीप पवार,वासुदेव गरुडे,रविंद्र सुरडकर,अतिश बोर्डे,मनिष भालेराव,अशोक सपकाळ,अशोक सरदार,रामेश्वर सरदार,संतोष सपकाळ,संतोष जाधव,धोंडू पठ्ठे यांच्यासह वंचितचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

रस्त्यावरील खाद्य स्टॉल्स बंद..

गॅसच्या तुटवड्यामुळे स्वयंपाक घरातील गॅस शेगड्या थंड पडल्या आहेत, चहाची टपरी, रस्त्यावरील खाद्य पदार्थांचे स्टॉल्स बंद झाले आहेत. जगण्यासाठी अनेकांना कोळसा आणि लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करून जगावे लागत आहे.हजारो छोटे व्यावसायिकांनी आपले दुकाने बंद केले आहेत. राज्यातील अनेक शहरात अनेक हॉटेल्समध्ये चहा, नाश्त्याची पदार्थ, इडली, डोसा, तळले जाणारे पदार्थांची विक्री बंद झाली आहे. लग्न समारंभ, घरगुती कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, केटरिंगची कामे गॅस टंचाईमुळे पुढे ढकलण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांनाही मिळत नाही मेसचा डब्बा

अनेक शहरात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मेसमध्ये गॅस नसल्यामुळे जेवणाचे डब्बे बंद झाले आहेत. अनेक विद्यार्थी आपल्या गावाकडे परत गेले आहेत. अनेक शहरात रिक्षा चालकांनी मोर्चा काढून आपला आक्रोश व्यक्त केला. सर्व सामान्य जनता पूर्णतः हतबल झाली आहे. अनेक ठिकाणी एलपीजी गॅस कमी प्रमाणात मिळत असल्यामुळे रिक्षा भाडे वाढले नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

सरकार उटावरुन शेळया हाकलते

केंद्र सरकार, राज्य सरकार म्हणत आहे की, परिस्थिती सर्वसामान्य आहे. तर मग सांगा की, नागरिक अजूनही गॅस सिलेंडरसाठी रांगेत का उभे आहेत? आपण आपल्या AC ऑफिसमधून बाहेर पडून बाहेरील परिस्थिती बघावी. गॅस सिलेंडरसाठी लाखो लोकं रांगेत उभे आहेत. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाले आहेत. अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरचा काळा बाजार होतोय, दुकाने बंद पडताय. गॅस सिलेंडर काही ठिकाणी मिळत जरी असला, तरी 5 ते 7 हजार रुपयांचा मिळत असल्याच्या व्यथा जिल्हाप्रशासनासमोर मांडत सरकारचा कोणतेही संकट नाहीचा दावा फोल असल्याचे निलेश जाधव म्हणाले.

ह्या आहेत न्याय्य मागण्या

गॅस सिलेंडरसाठी होणारी कृत्रिम टंचाई थांबवून गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यात यावा, 25 दिवसांनंतर गॅस मिळेल, ही अट शिथिल करण्यात यावी. काळाबाजारी करणाऱ्या लोकांवर सक्त कायदेशीर कारवाई करण्यात यावी. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून कम्युनिटी किचन सुरू करण्यात यावे, सरकारकडून प्रत्येक 2 किलोमीटरवर जेवणाची व्यवस्था करून गरजू लोकांना अन्न देण्यात यावे. सरकारने सांगावे की, परिस्थिती कधी सामान्य होईल?, जेणेकरून सामान्य लोकांना ह्या परिस्थितीसाठी तयार राहता येईल. राज्यात अनेक ठिकाणी KYC नाहीये म्हणून नागरिकांना गॅस सिलेंडर नाकरला जात आहे. उज्जवला गॅस योजनेअंतर्गत किती लोकांना गॅस सिलेंडर दिले आहे? याचे ऑडिट करावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Don`t copy text!