एसपीओ प्रभाकर वाघमारे व वाहतूक शाखेच्या हेकाँ.छबु पांडव यांचे प्रयत्न!
बुलढाणा: रविवार बुलढाण्याचा आठवडी बाजार असतो. आज 5 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास बुलढाण्याचा आठवडी बाजारात आलेल्या 35 वर्षीय महिलेच्या पर्समधील मोबाईल चोरीला गेला. महिलेले सर्वीकडे मोबाईल शोधला मात्र सापडला नाही, अखेर मोबाईलवर कॉल केला असता सदर मोबाईल वाहतूक शाखेकडे जमा असल्याची माहिती मिळाली. सदर पर्स व मोबाईल शहर पोलिसमध्ये माजी मानसेवी प्रभाकर वाघमारे व हेकाँ.छबु पांडव यांच्या प्रयत्नामुळे महिलेच्या स्वाधीन करण्यात आला.
साधारणता पावणे पावणेपाच वाजेची वेळ होती, बाजारामध्ये एक महिला माझा मोबाईल व पर्स चोरीला गेला, असे म्हणून मोबाईलचा शोध घेत होती. महिला 35वर्षाची तिच्यासेाबत दोन लकरं, मुलांना कपडे घ्यायचे बाजार करायचा, असा चेहऱ्यावर आनंद घेऊन बाजारात आलेल्या महिलेच्या चेहऱ्यावरील आनंद काही क्षणात गायब झाला. त्याला कारण होते, मोबाईल आणी पर्स चोरीला गेला. सूनवायरी असल्याने घरचे बोलणार तो वेगळा ताप महिलेच्या डोक्याला होता. चिकुकल्या लेकरांसह सदर महिला बुलढाण्याच्या भल्या मोठा बाजारात आपला मोबाईल आणि पर्स पिंजून काढू लागली, दरम्यान ती दुकानदारांना विचारू लागली.. मी इथे आले होते माझा मोबाईल तुमच्या दुकानात शोधू द्या, सदर माहिती बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे माजी मानसेवी विशेष पोलीस अधिकारी प्रभाकर वाघमारे यांना समजल्यावर त्यांनी शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार रवी राठोड यांना माहिती दिली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कर्मचारी पाठवितो, असा संदेश दिला. तोपर्यंत क्षणाचा विलंब न लावता प्रभाकर वाघमारे यांनी महिलेला घाबरू नका, ज्या पर्समध्ये तुमचा मोबाईल आहे तो नंबर सांगा, त्या मोबाईलवर संपर्क केला असता सदर मोबाईल व पर्स सुरक्षित असल्याचा निरोप त्यांनी त्या महिलेला सर्वांसमोर दिला. बाजाराच्या मुख्य प्रवेशासमोर जिल्हा वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर आपले कर्तव्य बजावत असलेले जिल्हा वाहतूक शाखेचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल पांडव यांच्याकडे मोबाईल व पर्स जमा झाल्याची माहिती त्यांना मिळाली व सदर महिलेला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून त्यांना त्यांचा मोबाईल व पर्समधील पैसे कर्तव्यावर असलेले पोलिस उपनिरीक्षक शशिकांत धारकरी, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल छबू पांडव, हेड कॉन्स्टेबल रंजीत हिवाळे महिला हेड कॉस्टेबल आशा गायकवाड, वाहन चालक तायडे यांच्या उपस्थितीत बुलढाणा शहर पोलिसांनी सदर मोबाईल व पर्स महिलेलकडे सुपूर्द करण्यातआल्याने महिला व त्यांच्या चेहराऱ्यावर वेगळाच आनंद पहायला मिळाले. सदर महिलेने पोलिसांचे आभार व्यक्त केले.


























