बुलढाणा: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहाने तालुका व शहर पातळीवर साजरी करा, अशा सूचना वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
स्थानिक विश्राम गृह येथे आज रविवार 12 एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी निलेश जाधव बोलत होते. या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष Adv.प्रकाश आंबेडकर यांनी आदेश दिलेले आहेत की, भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहाने तालुका व शहर पातळीवर साजरी करा त्या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी उपस्थितीतांना मार्गदर्शन करुण जयंती ही सकाळी तालुका व शहर स्तरावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने साजरी करण्यासंदर्भात सर्व पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. गॅस सिलेंडर बाबत जे आंदोलन वंचितच्या माध्यमातन ‘नरेद्रर कब मिलेगा सिलेंडर’ याबाबत गावपातळीवर महीला आघाडीच्या व सर्व विंगच्या माध्यमातन गाव व शहर दौरे करुन महिलांसोबत चर्चा करुन आताची गॅसची परीस्स्थीत व उपाययोजना काय अपेक्षित आहे, या संदर्भात सुद्धा पक्षाने आदेश दिलेला आहे, असे सांगितले. तालुका व शहर बैठकी बोलावून या संदर्भात गाव व शहर दौरे नियोजित करण्यासंदर्भात तालुका व शहर पदाधिकारी यांना सूचना दिल्या. या बैठकीला सर्व तालुकाध्यक्ष मनोज खरात, समाधान डोंगरे, संजय धुरंदर चिखली, दिलीप मुळे, मधुकर साळवे दिलीप राठोड लोणार, आबाराव वाघ, बबन वानखेडे, मोबीन शेख, शेषराव मोरे, पवन अवसरमोल,बाळासाहेब वानखेडे,विलास प्रधान,अनिल जाधव,शेषराव मोरे,रवीराज खराटे,संजय जाधव,प्रकाश इंगळे,दिलीप वाकोडे यांच्यासह जिल्हा व तालुकापदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























