Tuesday, May 12, 2026
Home Buldana मोताळ्यात चोरट्यांचे नेटवर्क पावरफुल्ल का? बसमध्ये चढणाऱ्या महिलेचे दागिणे, इब्राहिमपूर येथे घरफोडी...

मोताळ्यात चोरट्यांचे नेटवर्क पावरफुल्ल का? बसमध्ये चढणाऱ्या महिलेचे दागिणे, इब्राहिमपूर येथे घरफोडी तर राजुर येथे दुकानात चोरी!

4

मोताळा- तालुक्यातील काही ठिकाणी पोलिसांपेक्षा चोरट्यांचे नेटवर्क पावरफुल्ल आहे का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत असून त्याला कारणही तेवढेच मोठे आहे. झाले असे की मोताळा बसस्थानक परिसरात बसमध्ये चढतांना महिलेच्या पर्समधून चोरट्याने रोख रकमेसह 23 हजाराचे दागिणे लंपास केले. तर दुसऱ्या घटनेत इब्राहिमपूर येथे घर फोडून अडीच लाख रुपये रोख व राजुर येथे बुध्दी तेज चालण्यासाठी दुकानातील 750 रुपयांची 1 किलो बदाम व रोख 2 हजार असा 2750 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. चोरी करणाऱ्या या बुध्दीवान चोरट्यांना पकडण्याचे बोराखेडी पोलिसांसमोर एक मोठे आव्हान आहे.

झाले असे की, बोराखेडी पोस्टे हद्दीतील हाकेच्या अंतरावर असलेल्या मोताळा बसस्थानक परिसरात दागिणे चोरीच्या घटना नेहमीच घडतात. अशीच एक घटना आज सोमवार 11 मे रोजी उघडकीस आली. सौ. कल्पना दिनेश इंगळे रा. गुरुदक्षीणा अपार्टमेन्ट बिल्डींग सिडको महानगर छत्रपती संभाजी नगर ही महिला सकाळी 11 वाजेच्या सुमारास मोताळा बसस्टॉप येथुन मलकापुर ते छ.संभाजीनगर या बसमध्ये बसल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पर्समध्ये ठेवलेली 17 ग्रॅम वजनाचे गहुमणी व पेंण्डॉल असलेले सोन्याची गहुपोत किंमत 17 हजार, 70 गोल मणी असलेली सोन्याची पोथ पेण्डालसह पोथ त्यावेळची किंमत 5 हजार रुपये, तसेच नोटांचे बंण्डल 1 हजार रुपये असा एकूण 23 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. इब्राहिमपूर ता.मोताळा येथील अनिल सावजी श्रीनाथ व त्यांची पत्नी लग्नासाठी तोंडापूर येथे गेले असता त्यांच्या घरात चोरट्याने रात्रीचेवेळी दरवाजाचे कुलूप तोडून चोरी केली. भावजयीकडून घटनेची माहिती मिळताच श्रीनाथ तोंडापूर येथून इब्राहिमपूर येथे निघून आले. त्यांनी घरात जावून पाहिले असता त्यांना घरातील दोन पेट्या फोडलेल्या दिसल्या. त्यामधील एका पेटीत कपड्यामध्ये मका, गहु विकून ठेवलेले रोख रक्कम 2 लाख 50 हजार रुपये चोरीला गेल्याचे दिसून आले. तर तिसरी चोरीची घटना राजुर येथे घडली. तेथे ईस्माईल खान सरफराज खान यांचे दुकान फोडून बुध्दीमान चोरट्याने दुकानातील बुध्दीवाढविणारी 1 किलो बदाम 750 रुपये व गल्ल्यातील रोख 2 हजार असा एकूण 2750 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे पोलिसांपेक्षा चोरट्यांचे नटवर्क पावर फुल्लतर नाही ना? असा प्रश्न सुज्ञ नागरिक उपस्थित करीत आहे. पोलिसांनी तिन्ही चोरीच्या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. मात्र, त्या अज्ञात चोरट्यांचे नाव केंव्हा समोर येईल, याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून ‘त्या’अज्ञात चोरट्यांना पकडण्याचे बोराखेडी पोलिसासमोर एक मोठे आव्हान आहे.

Don`t copy text!