Saturday, April 18, 2026
Home Buldana बुलढाण्यात शिवजयंती उत्सवाचे खा.डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते आज उदघाटन!

बुलढाण्यात शिवजयंती उत्सवाचे खा.डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते आज उदघाटन!

427

बुलढाण्यात शिवप्रेमींचा मेळा भरणार!

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (17 ‍Feb. 2023) छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास रुपेरी पडद्यावर जीवंत उभा करण्याचे काम खा.डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या महामालिकेचे महाकलाकार खा.अमोल कोल्हे यांनी केले आहे. आज शुक्रवार 17 फेब्रुवारी त्यांच्या हस्ते शिवजयंती महोत्सवाचे बुलढाण्यात सायंकाळी 6 वाजता उदघाटन करण्यात येणार असल्याने शहरवासीयांना हा रुपेरी पडद्यावरील ‘रांगडा कलावंत’ पाहता येणार आहे

बुलढाणा शहरात साजरी होणारी शिवजयंती आगळीवेगळा विक्रम प्रस्थापित करणारी ठरत आहे. शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ.शोण चिंचोले यांनी तर वाहून घेतल्यागत कामाला सुरुवात केली असून सर्व टीम त्यांना सहकार्य करीत आहे. हा सोहळा ऐतिहासिक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना उदंड प्रतिसाद बुलढाणाकरांचा मिळत आहे. शहरातील डॉक्टर्स ,व्यापारी, मुस्लिम धर्मीय आणि शिवप्रेमी असा हा ‘छत्रपतींचा मेळा’ भरणार आहे.

विविध कार्यक्रमांची रेलचेल..
शिवकालीन शस्त्राचे प्रदर्शन ,गड किल्ले चित्र प्रदर्शनी, व्याख्यान, पोवाडे, शिवज्योत ,सांस्कृतिक कार्यक्रम आणि भव्य दिव्य शोभायात्रा असा “भरजरी थाट” यंदाच्या शिवजयंतीला लाभला आहे. वेगवेगळ्या समित्यांची निवड ही करण्यात आली आहे. राज्यात शिवजयंतीचा आगळावेगळा प्रयोग बुलढाण्यातून सुरू झाला. हा लोकोत्सव अभिनेते खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीने यंदा उंचीवर पोचणार आहे.

कार्यक्रमास पालकमंत्री यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती..
या कार्यक्रमास पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, खा.प्रतापराव जाधव, माजी मंत्री आ.डॉ.राजेंद्र शिंगणे, आ.संजय गायकवाड, आ.धीरज लिंगाडे, जिल्हाधिकारी डॉ.एच.पी.तुम्मोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आव्हाड, जिल्हा परिषद सीईओ. भाग्यश्री विसपुते आदींसह राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांसह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती राहणार आहे.

Don`t copy text!