तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या: 9 लक्ष 75 हजाराचा मुद्देमाल जप्त
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (26 FEB.2023) बुलढाणा स्थानिक गुन्हा शाखेचा पदभार हाती घेताच स्थागुशा प्रमुख अशोक लांडे यांनी जिल्ह्यात कारवाईचा मोठा धडाका लावला असून गुन्हेगारांमध्ये मोठा वचक निर्माण केला आहे. शेतकऱ्यांची सोयाबीन चोरणाऱ्या चोरट्यांच्या स्थागुशा पथकाने 24 तासात छडा लावीत त्यातील 3 चोरट्यांच्या मुसक्या आवळीत त्यांच्याकडून 9 लक्ष 75 हजारचा मुद्देमाल जप्त केला केला. सदर धडाकेबाज कारवाई 25 फेब्रुवारी रोजी रायपूर येथे करण्यात आली.
धाड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या धामगण गावातील एका शेतकऱ्याचे घरासमोरील वरांड्यात ठेवलेले सोयाबीनचे आठ कट्टे अंदाजे ५ क्विटल सोयाबीन २४ फेब्रुवारीचे रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले होते. याबाबत धाड पोस्टे.ला भादंवीचे कलम ३५/२०२३ कलम ३७९ गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. शेतकऱ्यांचा माल चोरीला गेल्याने पोलिस अधिक्षक सारंग आवाड यांनी याबाबत बुलढाणा स्थागुशा.प्रमुख अशोक लांडे यांना आदेशीत केले होते. त्यांनी पथक नेमले होते. पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक पांढर्या रंगाची कूझर गाडी ही संशयास्पदरितीने मिळून आल्याची माहिती 25 फेब्रुवारी रोजी स्थागुशाला मिळाली होती. सदर कुझर ही रायपुर येथील असून पोलीसांनी सदरची गाडी रायपूर येथून जप्त करीत गाडी चालक विशाल तेजराव चिकटे रा.सिंदखेड मातला व त्याचे दोन मित्र आरोपी शेख राजीक शेख इब्राहिम , पबन महेंद्र खिल्लारे दोन्ही रा.रायपुर यांचा पाठलाग करुन ताब्यात घेवून त्यांना पोलिसी खाक्या दाखवितातच त्यांनी धामनगाव येथील एका शेतकऱ्याचे घरासमोर वराडयांत ठेवलेले सोयाबीनचे आठ कटटे अंदाजे ५ क्विटल सोयाबीन चोरुन नेवून एक मालवाहु अॅपेमध्ये लपवून ठेवले असल्याबाबत कबूली दिली. सदर गुन्हयात वापरलेली पांढऱ्या रंगाची कुझर कार व मालवाहु अॅपे देखील जप्त करुन गुन्हयात चोरीस गेलेले ५ क्विटल सोयाबीनचे आठ कट्टे किंमती अंदाजे २५ हजार रू, पांढऱ्या रंगाची कुझर कार किंमत 8 लाख रुपये, पिवळ्या रंगाचे मालवाहुअॅपे किंमत दिड लाख असा एकूण ९ लाख ७५ हजार रू चा मुदेमाल जप्त करुन आरोपी विशाल तेजराव चिकटे रा.सिंदखेड मातला, शेख राजीक शेख इब्राहिम, पवन महेंद्र खिल्लारे दोन्ही रा.रायपुर यांच्या मुसक्या आवळल्या आहे. सदर कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक सारंग आवाड, अप्पर पोलिस अधिक्षक बी.बी.महामुनी, अप्पर पोलिस अधिक्षक अशोक थोरात यांचे मार्गदर्शात स्थागुशा प्रमुख अशोक लांडे यांच्या आदेशान्वये पोलीस अंमलदार सफौ दशरथ जुमडे, पो.ना.जगदेव टेकाळे , पो.ना अनंत फरतळे ,पो.ना. पुरुषोत्तम आघाव,पो.कॉ. मनोज खारडे व पो.कॉ कैलास ठोंबरे यांनी केली आहे.