पीकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

573

पिंपळगाव सराई-भारज चौफुलीवरील घटना

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (25 FEB.2023)बुलढाणा तालुक्यातील रायपूर पोस्टे.अंतर्गत असलेल्या भारज फाटा चौफुलीवर माहवाहू पिकअपने एका दुचाकीला जबर धडक दिली. धडक एवढी भिषण होती की, यामध्ये दुचाकीवरील पप्पू खान राजू खान यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारार्थ बुलढाणा येथे नेत असतांना त्यांचा वाटेतच दुदैवी मृत्यू झाला. सदर घटना आज 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. भारज फाट्यावर 25 जानेवारीला सुध्दा अपघात होवून 1 गंभीर तर 14 जण जखमी झाल्याची घटना घडली होती.

प्राप्त माहितीनुसार बंदावल ताबोली जि.सवई माधवपूर बागडोली राजस्थान येथील पप्पु खान राजू खान हे ग्रामीण भागामध्ये चादरी, स्वेटर, ताडपत्री व इतर साहित्य महिन्याच्या हप्प्त्यावर विकण्याचा धंदा करतात. नेहमी प्रमाणे पप्पु खान(वय 44) हे आपल्या हिरो होंडा स्प्लेंडर क्र. आर.जे.26 एस.ए.6049 जात असतांना त्यांना आज 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान भारज फाट्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू पिकअप वाहन एम.एच.20 जीसी-0347 च्या चालकाने जोरदार धडक दिली. धडक एवढी भिषण होती की, यामध्ये पप्पु खान यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. त्यांना पुढील उपचारार्थ बुलढाणा येथे नेत असतांनाचा त्यांचा वाटेतच दुदैवी मृत्यू झाला. मृतकाचे नातेवाईक सलाम खा खैराती खा रा.खिडगी ता.निवाई जिल्हा टोक राजस्थान यांच्या फिर्यादीवरुन रायपूर पोस्टे.ला पीकअप वाहन चालकाविरुध्द भांदवीचे कलम 279.304A. IPC सह कलम134(b) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पेाहेकाँ.प्रेमसिंग पवार हे करीत आहेत.