~शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणीक व्हीडीओ निर्मीती स्पर्धा 2023
~तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर दिले जाणार साडेदहा कोटींचे बक्षीस
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (12.May.2023) शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होवून ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी राहवी. यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या तसेच सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, शिक्षक-प्रशिक्षक स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यासाठी राज्यस्तरावर दर्जेदार शैक्षणीक व्हीडीओ निर्मीतीच्या खुल्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार देवून शिक्षकांना गौरविण्यात येणार आहे.
इयत्ता 1 ली व दुसरीसाठी, तिसरी ते 5 वी भाषा, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास या विषयावर कोणत्याही सॉफ्टवेअरचा उपयोग करुन स्वत:व्हीडीओ तयार करणे, तसेच स्व:त स्क्रीन रेकॉर्ड करुन तयार केलेला व्हीडीओ, सहावी ते आठवी, नववी ते दहावी, अकरावी व बारावींच्या शिक्षकांसाठी भाषा, गणित, विज्ञान, इंग्रजी, सामाजिक शास्त्रे, अध्यापक विद्यालय भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, शिक्षक प्रशिक्षणाशी निगडीत आधुनिक विचार प्रवाह या विषयावर स्वत: केलेला Animated व्हीडीओ, पेन व टॅबलेटचा उपयोग करुन बनविलेला व्हीडीओ, Immersive eContent (Augmented Reality / Virtual Reality / Virtual Lab/ 360 Degree/ Simulations वर आधारीत व्हीडीओ, खेळावर आधारीत व्हीडीओ (Gamification), ई-चाचणीवर आधारीत व्हीडीओ (E-assessments), शासन प्रणालीवर आधारीत बोलीभाषेमधून केलेला व्हीडीओ, दिव्यांगत्व प्रकारानुसार अध्ययनासाठी व्हीडीओ तयार करुन ते शिक्षकांना आपलया गुगल ड्राईव्हला अपलोड करुन Anyone with link करुन Editor त्याचा Access हा पर्याय ठेवावा व सदरची लिंक ही उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या प्रणालीवर अपलोड करावी लागणार आहे.
असे आहेत बक्षीसे..
तालुकास्तरावर बक्षीस 5 हजार, द्वितीय 4 हजार व तृतीय 3 हजार, जिल्हास्तरावर प्रथम बक्षीस 10 हजार, द्वितीय 9 हजार, तृतीय 8 हजार तर राज्यास्तरावर प्रथम बक्षिस 50 हजार, द्वितीय 40 हजार तर तृतीय बक्षीस 30 हजार रुपये व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. व्हीडीओ मुल्यमापनासाठी ठरलेल्या निकषानुसार गुण ठरवून देण्यात आले आहेत.
स्पर्धसाठी 11 कोटी 23 लक्ष रु.चा निधी मंजूर
408 तालुकास्तरावर बक्षीस देण्यासाठी 7 कोटी 42 लक्ष 56 हजार, 36 जिल्हास्तरीय बक्षीस देण्यासाठी 2 कोटी 72 लक्ष 16 हजार रुपये तर राज्यस्तरीय बक्षीस देण्यासाठी 36 लक्ष 60 हजार रुपयांचे बक्षीस असे एकूण 10 कोटी 48 लक्ष 32 हजाराचे बक्षीसे शिक्षकांना देण्यात येणार आहे. तर पोर्टल विकसनसाठी 50 लक्ष पुरस्कार वितरण, कार्यक्रम आयोजन, प्रमाणपत्र व सन्माचिन्ह देण्यासाठी 25 लक्ष रुपयांची शासनस्तरावर तरतूद करण्यात आली आहे.




























