खरंच, जिल्हा रुग्णालयातील करोडोच्या भ्रष्टाचाराचे गोडबंगाल बाहेर येईल का?

50

मनसेच्या तक्रारीची अकोला उपसंचालकांकडून दखल; सहा सदस्यीय समिती करणार चौकशी

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (2JULY.2023)जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार मनसेचे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी अकोला उपसंचालक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती. त्या तक्रारीची गंभीर दखल घेत उपसंचालक यांनी सहा सदस्यीय समितीची निवड केली असून ती समिती भ्रष्टाचाराची चौकशी करणार असून भ्रष्टाचार बाहेर येईल की, त्यामध्ये कुठें माशी शिंकेल हे मात्र लवकरच समजेल !

जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे कोविड काळात विविध प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात आले होते, त्यामधील आयसीयु मध्ये तसेच आणखी साहित्य खरेदी करण्यात आले. त्या सुविधांमध्ये काय अंतर्भूत होते, त्या साहित्यापासून गोरगरीब रुग्णांना कोणत्या प्रकारचा फायदा झाला. तसेच अनेकाप्रकारे शासनाकडून आलेला करोडोचा निधीचे काय केले, याबाबत अमोल रिंढे पाटील यांनी जिल्हाधिकारी तसेच अकोला उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ यांच्याकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची उपसंचालक यांनी गंभीर दखल घेतली असून जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथील साहित्य खेरदी घोटाळ्यातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी सहा अधिकारी / कर्मचाऱ्यांचे समिती गठीत केली आहे. सदर समिती चौकशी करुन अहवाल उपसंचालक अकोला यांना पाठविणार आहे. समिती काय अहवाल पाठविते, की त्यामध्ये माशी शिेकेल हे मात्र लवकरच समजेल !

भाजपा प्रवक्ता विनोद वाघ यांचा 200 कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप

बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना काळात साहित्य खरेदीमध्ये 200 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी सुध्दा भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्याची मागणी केली होती, परंतु समिती गठीत केली नसल्याने त्यांनी 20 जून रोजी परत उपसंचालकांना निवेदन दिले होते.