जिल्हा हादरला: समृध्दी महामार्गावर भिषण अपघात; होरपळून 25 ठार !

60

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (1JULY.2023) समृध्दी महामार्गावरील अपघाताची मालिका थांबता थांबत नाही. शनिवार 1 जुलैच्या रात्री 1.30 ते 2 वाजेच्या सुमारास सिंदखेड राजा हद्दीतील पिंपळखुटा शिवारात मुंबई-नागपूर महामार्गावर एका खाजगी बसला अपघात होवून त्यामध्ये 25 जणांचा होरपळून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार सिंदखेड राजा पोलिस स्टेशन हद्दीतील पिंपळखुटा शिवारात मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गावर चॅनल नं 323 जवळ यवतमाळवरुन पुणेकडे जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बस क्र.एम.एच.29 बीई-1819 ला आज 1 जुलैच्या रात्री 2 वाजेच्या सुमारास अपघात होवून आग लागल्याने यामध्ये 25 प्रवाशांचा घटनास्थळवार होरपळून मृत्यू झाला आहे. मृतदेह तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे पाठविण्यात आले आहेत. अपघातमध्ये बचावलेल्या 8 प्रवाश्यांवर प्राथमिक उपचार करुन करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थीर आहे. सदर विदर्भ ट्रॅव्हल्सचे चालक व क्लिनर यांना चौकशीसाठी सिंदखेड राजा पोस्टे.आणण्यात आले आहे. तर काही प्रवाशांना देऊळगाव राजा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.

अशी आहेत जखमीचे नावे

चालक शेख दानीश शेख इस्माईल दारव्हा जि.यवतमाळ, क्लिनर संदीप मारोती राठोड तिवसा, योगेश रामराव गवई औरंगाबाद, साईनाथ धरमसिंग पवार माहूर, शशिंकांत रामकृष्ण गजभिये रा.पांढरकवडा जि.यवतमाळ, पंकज रमेशचंद्र जिल्हा कांगडा हिमाचल प्रदेश तर दोन जखमींची नावे कळू शकले नाही.

नातेवाईंकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर जारी

समृध्दी महामार्गावर आज 1 जुलै रोजी झालेल्या अपघातासंदर्भात खाजगी बसमधील मृतक प्रवाशांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी बुलढाणा कार्यालय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग मोबाईल क्र.7020435954 व 07262242683 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.