आता कुठे गेली निष्ठा ;अजितदादा पवार उपमुख्यमंत्री व इतरांनी धेतली मंत्रीपदाची शपथ !

61

विकासाच्या मुद्दावर पुरोगामी विचार हरविले? ;वर्षभरात महाराष्ट्रात दुसरे राजकीय बंड !!

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (3JULY.2023) म्हणतात प्रेम, युध्द व राजकारणात सर्व काही क्षम्य असते, त्याचाच प्रत्येय सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात येत आहे. एका वर्षापुर्वी एकनाथराव शिंदे यांनी हिेदुत्वाच्या मुद्दावर बंड पुकारले पुकारल्याने त्यांच्यावर 50 खोके एकदम ओकेचे लेबल लावण्यात आले होते. एक वर्षाचा कालावधी संपत नाही तर तोवर पुन्हा राष्ट्रवादीत मोठी फुट होवून अजितदादा पवार यांच्यासह राकाँ.चे दिग्गज नेत्यांनी देवेंद्र फडणवीस व एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्र व देशाच्या विकासासाठी 2 जुलै रोजी दुपारी राजभवनात राकाँच्या ­­­नेत्यांनी उपमुख्यमंत्री व मंत्रीपदाची शपथ घेतली, त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील समृध्दी महामार्गावर अपघातामध्ये ठार झालेल्या 25 जणांवर बुलढाणा येथील स्मशानभूमीमध्ये सामूहिक अंत्यसंस्कार चालू होते , ही दृष्य जनतेमध्ये चिड निर्माण करणारे होते.

उध्दव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मु्द्याला बगल देवून राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळावणी करुन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्याने जवळपास अडीच ते तीनवर्षांनी सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी बंड पुकारुन 40 आमदारासह हिदुत्वाच्या मुद्यावर भाजपासोबत महाराष्ट्रामध्ये जुलै 2022 मध्ये भाजपा-शिवसेना युतीच सरकार स्थापन केले होते. त्या धटनेला एकावर्षाचा कालावधीत उलटत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज 4 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम करणारे अजितदादा पवार यांनी 40 आमदारांचे समर्थन असल्याचा दावा करीत शुक्रवारीच विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याचे सांगत 2 जुलै रोजी राजभवनात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ बसत राज्यपाल रमेश बैस महोदयांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार तर छगनराव भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्री म्हणून शपथ घेवून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला एक धक्काच दिल्याने आता कार्यकर्त्यांना प्रश्न पडला की, शरदचंद्र पवार की अजितदादा पवारांचे समर्थन म्हणून सांगायचा.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांचीच ?

शपथविधी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी पत्रकार परिषद घेवून जनतेच्या दरबारामध्ये जावून निर्णय धेणार असल्याचे सांगत राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांची असल्याचे सुतोवात केले. यावेळी बोलतांना त्यांच्या चेहऱ्यावर कोणी बाहेर गेले याचे कोणतेही दु:ख दिसत नव्हते, परंतु त्यांनी चिन्हाबाबत क्लिष्ट पध्दतीसाठी कोर्टाची पायरी चढण्याबद्दल कोणतेही भाष्य केले नाही, हे उल्लेखनीय! तर अजितदादा पवार यांनी जिल्हा परिषद, पंचायत निवडणूक व कोणत्याही निवडणूका पक्षाच्या (NCP) चिन्हावरच लढणार असल्याचे सांगितले. मात्र 5 जुलैच्या बैठकीनंतर शरदचंद्र पवार व अजितदादा पवार यांच्यासोबत किती आमदार, त्यानंतर खऱ्या राजकीय भूकंपाची परिस्थीती कळेल!

मंत्रीपदाची शपथ चेहरा मात्र दु:खी !

राजभवनात उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेतांना अजितदादा पवार यांच्यासह छगनराव भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांच्या चेहऱ्यावर कोणत्याच प्रकारचा आनंदाचा भाव दिसत नव्हता, तर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे मोबाईल चाळत होते. नेहमी अजितदादा म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीनंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना देशाच्या व राज्याच्या विकासासाठी अजित पवार आमच्यासोबत आल्याचा उल्लेख करायला ते विसरले नाही.