एका जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सांभाळतांना नाकीनऊ आले होते-अजितदादा पवार ! फडणवीसांकडे सहा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद; त्यांना शुभेच्छा !

267

बारामती(BNUन्यूज) फुटाफुटी नंतर सर्व काही ओके…मग जिल्ह्याला पालकमंत्री केंव्हा मिळणार, या विरोधी पक्षाच्या टिकेनंतर अखेर शनिवार 25 सप्टेंबर रोजी जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले. उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मला एका जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी सांभाळतांना नाकीनऊ आले, आता देवेंद्र फडणवीस सहा जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी ते कसे सांभाळतील ? विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी फडणवीसांना बारामतीत सहकारी बँकेच्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलतांना टोला लगावला.

बंडखोरीच्या नाट्यानंतर अखेर शिवसेना बंडखोर आमदार व भाजपाने महाराष्ट्र सरकार बनविले, सरकार स्थापन होवून बराच कालावधी झाल्यानंतर सुध्दा जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले नसल्याची विरोधी पक्षाकडून टिकेची झोड उडत होती, अखेर 25 सप्टेंबर रोजी पालकमंत्र्यांची घोषणा झाली आहे. शिदे-फडणवीस सरकारमधील विविध नेत्यांकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पालकमंत्री म्हणून सहा जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. माझ्याकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होतं, तर माझ्या नाकीनऊ आलं होतं, ते सहा जिल्ह्यांचा कारभार कसा सांभाळणार आहेत? असा सवाल अजित पवारांनी विचारला आहे.

दोन दिग्गजांची राजकीय जुगलबंदी रंगणार काय?
राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार बनण्यापूर्वी उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी भल्या पहाटे भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार बनविले होते, परंतु टिकेची झोळ उडाल्यानंतर पुढे ते टिकू शकले नाही. तेच अजितदादा पवार आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याची पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने ते कारभार कसा सांभाळतील, असा टोला मारत आहे, यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी दोघांमध्ये राजकीय दंगल रंगेल काय? असा प्रश्न या अनुषंगाने राजकीय वर्तूळात उपस्थित केल्या जात आहे. (फोटो-संग्रहीत इंटरनेटवरुन)