मोताळा तालुक्यातील राजूर घाटातील घटना
Buldana News Update
मोताळा (3 Dec.2022) मृत्यू कोणत्या स्वरुपात आणि केंव्हा येईल हे सांगता येत नाही. अशीच एक दुदैवी घटना मोताळा तालुक्यातील मुर्ती फाट्यावर राहणारे मख कुटुंबीयावर ओढावली आहे. सचिन मख हा आपल्या दुचाकीने वडील अशोक मख यांच्या समवेत बुलडाण्याकडे चालला होता, दरम्यान मलकापूरकडे जाणाऱ्या क्रेटा कारने दुचाकीला धडक दिली, या धडकेत अशोक मख यांचा मृत्यू झाला तर सचिन मख याच्यावर लध्दड हॉस्पीटल बुलढाणा येथे उपचार सुरु आहेत. सदर दुदैवी घटना आज 3 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास बुलढाणा घाटातील वळणावर घडली.
बुलढाणा येथे घराचे बांधकाम सुरु असल्याने अशोक सखाराम मख (वय 55) रा.मुर्ती फाटा व त्यांचा मुलगा सचिन अशोक मख (वय 25) हे आपल्या दुचाकीने आज 3 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकी क्र.एम.एच.अेव्ही.2597 ने जात होते. दरम्यान मलकापूरकडे जाणाऱ्या क्रेटा कार क्र.एम.एच.21 बीएफ. 3699 गाडीचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर कार मख यांच्या दुचाकीवर धडकली. या धडकेत दुचाकीच्या मागे बसलेले अशोक मख खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथे प्रथमोपचार करुन मेहेत्रे हॉस्पीटलमध्ये हलविण्यात आले होते. मात्र तेथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले. तर सचिन मख याला गंभीर मार लागल्याने त्याच्यावर लध्दड हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. सचिन मख हा मुंबई येथे इंजिनीअर म्हणून नोकरीला होता. घराचे बांधकाम सुरु असल्याने तो काही दिवसापुर्वी गावाकडे आला होता. 10 ते 12 दिवसांनी मख कुटुंबीय बुलढाणा येथे नविन घरात राहण्यासाठी जाणार होते, त्यापुर्वी अशोक मख यांच्यावर काळाने घाला घातला. अशोक मख यांच्यावर सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास शोकाकूल वातावरणात मुर्ती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. वृत्तलिहेपर्यंत बोराखेडी पोस्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.