काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत अ‍ॅड.विजय सावळे पाटलांचे नाव आघाडीवर?

691

हालचाली सुरु; विश्वसनीय सुत्रांची माहिती

Big Breaking

Buldana News Update
विष्णु शिराळ..
बुलढाणा(4 Dec.2022) काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदाच्या शर्यतीत ॲड.विजय सावळे पाटील, प्रकाश पाटील व कासम गवळी या नावाची चर्चा होती. परंतु कासम गवळी यांनी 27 सप्टेंबर रोजी खा.मुकुलजी वासनिकांच्या वाढदिवशी माघार घेतली, तर ‘भारत जोडो यात्रे’ दरम्यान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका नेतृत्वाला प्रचंड झापले, दोघांमध्ये प्रचंड शाब्दीक चकमक झाल्याची विश्वसनीय माहिती मिळाल्याने मराठा समाजाला न्याय देण्यासाठी अ‍ॅड.विजय सावळे पाटील यांचे नाव जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आघाडीवर असून तश्या हालचाली सुरु असल्याच्या चर्चाना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. परंतु अ‍ॅड.सावळे काँग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष होतात की, माजी आमदार राहुल बोंद्रे यांना पुन्हा संधी दिली जाते याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात मराठा समाज बहुसंख्येने आहे, असे असतांना देखील मराठा समाजाच्या गळ्यात काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडली नसल्याने मराठा समाज काँग्रेसपासून मोठ्या प्रमाणात दुरावला गेला आहे. तर दुसरीकडे जवळपास सर्वच राजकीय पक्षात मराठा समाजाला जिल्हाध्यक्ष व कार्यकारीणीमध्ये मोठे प्राधान्य देण्यात आलेले आहे. परंतु काँग्रेसने मात्र मराठा समाजाला जिल्हाध्यक्ष पदापासून दूर ठेवल्याने काँग्रेस हा अल्पसंख्याक समाजाचा पक्ष असल्याची काँग्रेसवर जोरदार टिका होवू लागली. त्याला कारणही तेवढेच मोठे आहे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष धुपदराव सावळे, विद्यमान जिल्हाध्यक्ष आ.अ‍ॅड.आकाश फुंडकर, प्रदेश राजकारणात आ.डॉ.संजय कुटे तसेच आ.श्वेताताई महाले तर एकनाथराव शिंदे गटात खा.प्रतापराव जाधव, आ.संजय गायकवाड, वानखेडे, उध्दव ठाकरे गटामध्ये शिवसेना जिल्हाध्यक्ष नरेंद्र खेडेकर, दत्ता पाटील, प्रा.आशिष रहाटे, वसंतराव भोजने, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माजी राज्यमंत्री आ.डॉ.राजेंद्र शिंगणे, संतोष रायपूरे, नरेश शेळके, टी.डी.अंभोरे पाटील, सौ.अनुजाताई सावळे हे सर्व मराठा समाजाचे आहेत.

काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारीणीमध्ये सुध्दा मराठा समाजाला नावापुरतेच स्थान असून या कार्यकारीणीमध्ये अ‍ॅड.संजय राठोड, श्यामभाऊ उमाळकर, विजय अंभोरे, अ‍ॅड.गणेश पाटील, स्वातीताई वाकेकर, दादूसेठ, रामविजय बुरुंगले, धनंजय देशमुख तर नाममात्र अ‍ॅड.जयश्रीताई शेळके यांना स्थान देण्यात आले आहे.

अ‍ॅड.विजय सावळे यांचा राजकीय प्रवास..
अ‍ॅड.विजय सावळे हे सन 1980 पासून मुकुलजी वासनीक यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाशी जोडलेले आहेत. ते नागपूर विद्यापीठ संघ अध्यक्ष तसेच जिल्हा बार असोसिएशनचे 15 वर्ष अध्यक्ष, सहकार क्षेत्रात 4 वेळा संचालक तसेच 2 शाळांचे उपाध्यक्ष राहिले असून त्यांची वैद्यकीय क्षेत्रात सुध्दा भरीव कामगिरी असून त्यांची 42 वर्ष पक्षाशी असलेली एकनिष्ठपणा पाहता अ‍ॅड.विजय सावळे यांना काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी धुरा दिल्यास, दुरावलेला मराठा समाज काँग्रेसशी जोडल्या जावून भविष्यात मोठा फायदा होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तविल्या जात आहे.

असे आहेत आतापर्यंतचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष..
1)गोविंदराव भाटीया
2)सुबोध सावजी
3)जनुभाऊ बोंद्रे
4)अ‍ॅड.गणेशराव पाटील
5)श्यामभाऊ उमाळकर
6)विजय अंभोरे
7)राहुल बोंद्रे