बुलढाणा जिल्ह्यात गायरान जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या 35 हजार भूमिहीनांना दिलासा !

667
-समता संघटनेच्या उपोषणाची चौथ्या दिवशी राज्य सरकारकडून दखल
-गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढू नये; महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटलांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
-राज्यातील 22 लाख भूमिहीन अतिक्रमण धारकांनी केले आहे अतिक्रमण

Buldana News Update
मुंबई (30 Nov.2022) गायरान जमिनीवरील भूमिहीन अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण काढू नये यासाठी समता(Samta) संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन गवई (Nitin Gawai, राज्याध्यक्ष आम्रपाल वाघमारे (Amrapal Waghmare) व बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजय दोडे (Vijay Dode) यांच्या नेतृत्वात संविधान दिनापासून आझाद मैदान मुंबई येथे 350 पुरुष व 150 महिलांनी कडाक्याच्या थंडीत संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजी आझाद मैदान मुंबई (Azad Maidan Mumbai) येथे आमरण उपोषण सुरु केले होते. उपोषणाच्या चौथ्या दिवशी 29 नोव्हेंबर रोजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपोषण कर्त्यांच्या शिष्टमंडळ यांच्याशी चर्चा करुन राज्यातील कोणत्याही भूमिहीन अतिक्रमण धारकांचे गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढणार नाही, तसे निेर्देश राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या उपोषण कर्त्यांनी तूर्तास आपले उपोषण मागे घेतले आहे.

यामुळे सन 2011 पुर्वी गायरान जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या राज्यातील जवळपास 22 लाख तर बुलढाणा जिल्ह्यातील 35 हजार भूमिहीन अतिक्रमण धारकांना दिलासा मिळाला आहे. मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशाने शासन स्तरावरून प्रशासनाला गायरान जमीनीवरील अतिक्रमण निष्कासित करण्याचे आदेश महसूल प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. ही कारवाई भुमीहीन, गरीब जमीनी विकत घेण्यासाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या लोकांसाठी अन्यायकारक करणारी आहे. भूमीहीन, गोरगरीब, एसटी. ओबीसी भटक्या लोकांनी निवासी प्रयोजनासाठी व कृषी प्रयोजनासाठी गायरान जमीनीवर अतिक्रमण केले आहेत. सदर जमीनी जर सरकारने ताब्यात घेतल्या तर हजारो कुटूंब बेघर व उपजिवीकेपासून वंचित होणार असून दुदैवाने त्यांचेवर उपासमारीची वेळ येणार आहे. सरकारने या कारवाईस तात्काळ स्थगिती देवून सरकारने मा.न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल करुन सदर अतिक्रमणे नियमानुसार करण्यात यावी, या मागणीसाठी बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 500 महिला व पुरुषांनी समता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन गवई व जिल्हाध्यक्ष विजय दोडे यांच्या नेतृत्वात आझाद मुंबई येथे सुरु केलेल्या उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाशी चौथ्या दिवशी 29 नोव्हेंबर रोजी महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रालयात सायंकाळी 6 ते 7 वाजेदरम्यान समता संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करुन राज्यातील गायरान जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या भूमिहीनांचे अतिक्रमण काढू नये, असे आदेश ना.विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने आझाद मैदानावर सुरु असलेले उपोषण तूर्तास स्थगीत केले आहे.

राज्यातील 22 लाख भूमिहीन अतिक्रमण धारकांना दिलासा
गायरान जमिनीवर राज्यात सन 2011 पुर्वी जवळपास लाखो भूमिहीन अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण केले आहे. अश्या राज्यातील 22 लाख भूमिहीन अतिक्रमण धारकांना दिलासा मिळाला असून बुलढाणा जिल्ह्यातील 35 भूमिहीन अतिक्रमण धारकांना याचा फायदा होणार असल्याचे समता संघटनेचे अध्यक्ष नितीन गवई व जिल्हाध्यक्ष विजय दोडे यांनी ‘Buldana News Update’ शी बोलतांना सांगितले.