अन् त्याने दोन वाघांच्या तावडीतून वाचविले प्राण!

796

देव तारी त्याला कोण मारी..?

Buldana News Update

बुलढाणा(6Dec.2022) म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी..याचाच प्रत्येय बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथील एका 40 वर्षीय युवकाला आला. दोन वाघ त्याच्यापासून 5 फुटाच्या अंतरावर मोठ्या तुरीच्या वयीमध्ये, त्यावेळी ते दोन वाघ देवकर यांना पाहत होते, तर देवकर त्यांना पाहत होते. मृत्यू अगदी जवळच होता. परंतु यावेळी संतोष देवकर हे मोठ्या हिमतीने जवळच असलेल्या पिंपरीच्या झाडावर चढून शेंड्यापर्यंत पोहचले, त्यावेळी ते वाघांना पाहत होते. हा चित्तथरारक प्रसंग चित्रपटातील नसून प्रत्यक्ष रायपूर येथील संतोष देवकर यांच्यासोबत 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता रायपूर शिवारात माळशेंबा रस्त्यावर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या पाटील यांचे शेताजवळ घडला आहे.

संतोष शिवाजी देवकर (वय 40) हे रायपूर येथे राहतात, त्यांनी गावापासून जेमतेम 2 कि.मी.डोंगर दऱ्यांच्या पायथ्याशी  असलेल्या शेतात गहू पेरलेला आहे. ते दिवसभर शेतात काम करतात आणि कामे आटोपून सायंकाळी घरी येतात. नित्यनियमाप्रमाणे ते 5 डिसेंबरच्या सायंकाळी शेतातील कामे आटोपून 7 वाजेच्या सुमारास घराकडे जाण्यासाठी निघाले, अंधार पडला त्यावेळी ते तुरीच्या वयीमध्ये होते. अंधार असल्याने त्यांनी आपली बॅट्रीक चालू केली, अन् त्यांना समोरच  5 फुटाच्या अंतरावर दोन वाघ दिसले, ते हळू चालत होते. यावेळी संतोष देवकर खूप घाबरले.. त्यांना काहीही सूचत नव्हते, अंगामधून थंडीतही घाम येवू लागला पळालो तर वाघ फाडतीन या भितीने त्यांनी प्रसंगवधान राखून हातातील बॅट्रीक फेकून दिली व जीव वाचविण्याच्या आकांताने ते जवळच असलेल्या पिंपरीच्या झाडाच्या शेंड्यावर चढले, यावेळी त्यांना दोनतीन घसाटे सुध्दा लागले .सायंकाळी झाली असल्याने जंगलात सर्वत्र काळकुट्ट अंधार पसरलेला होता. झाडावरुन त्यांनी त्या दोन वाघांना दुर जातांना पाहिले आणि आपल्या खिश्यातील मोबाईल काढून राजू गवळी, गजू गवळी, सोनुने साहेब यांना फोन लावून सर्व हकीकत कथन केली. सदर वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली आणि 15 ते 20 ग्रामस्थ मदतीसाठी धावून आल्याने संतोष देवकर यांच्या जीवात जीव आल्याने सुटकेचा श्वास सोडला. म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्येय रायपूर येथील देवकर यांना आला, एवढे मात्र खरे!

खूप घाबरलो होतो, परंतु जीव सुध्दा प्यारा होता-देवकर

दोन वाघ  5 फुटाच्या अंतरावर उभे दिसले, ते वाघ डोलात व शांत मी हाडामासाचा माणूस. त्यावेळी अंगाचे पाणी पाणी झाले, अंगाला खूप घाम आला मागे पळालो असतो तर वाघांनी फाडले असते, समोर मृत्यूच उभा होता, परंतु मोठ्या हिमतीने हळूच मागे जावून पिंपरीच्या झाडावर चढलो, यावेळी घाम खूप आला होता. परंतु जीव सुध्दा प्यारा होता. झाडावरून त्यांना पाहत होतो, तेही मला पाहत होते. परंतु काही वेळाने ते नरमादी वाघ निघून गेल्याचे संतोष देवकर यांनी ‘बुलडाणा न्यूज अपडेट’शी बोलतांना सांगितले.