शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी शिवसेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

270

Buldana News Update
बुलढाणा(5 Dec.2022)- शेतकरी एकीकडे निसर्गाच्या दृष्टचक्रात अडकलेला आहे, तर दुसरीकड विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे कोटावधी रुपये लाटले आहे. आर्थिक संकटात सापडल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी आली आहे. शेतकऱ्यांना विमा कंपन्यानी शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्यात यावी, तसेच रब्बी हंगामासाठी पुर्ण क्षमतेने वीज पुरवठा देण्यात यावा यासह आदी न्याय्य मागण्यांसाठी शिवसेना(Shivsena) ठाकरे गटाच्यावतीने जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत (Jalindhar Budhvat) जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करुन हा आवाज कुणाचा.. शिवसेनेचा, जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद अश्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता.

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निसर्गाच्या दृष्टचक्रामध्ये शेतकरी बांधव कायम अडकला असल्याचे चित्र आहे. गत दोन-तीन वर्षात होत असलेली अतिवृष्टी, परतीचा पाऊस खरीप हंगामाचे प्रचंड नुकसान करत आहे. शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यासाठी शासनाकडून जनजागृती करण्यात येते. मात्र या पीक विम्याच्या रकमेपोटी शेतकरी भरत असलेल्या हप्त्याच्या तुलनेत ५० ते १०० रुपये आणि अनेक ठिकाणी तर त्याही पेक्षा कमी मोबदला मिळाला आहे. विदर्भ (Vidharbh) हा आणि त्यातही बुलढाणा (Buldhana) जिल्हा हा शेतकरी आत्महत्या ग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. हा प्रकार शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतो. सोबतच रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे, ओलितासाठी दिवसा वीज मिळणे आवश्यक आहे. मात्र लोडशेडींग सुद्धा सुलतानी जाचाचा प्रकार करत आहे. दिवसा लाईन मिळत नसली तरी रात्रपाळीवर शेतकरी पिकांना जीवदान देतात. त्यातही खराब रोहित्र बदलून देण्यास महावितरण विभाग हेटाळणी करते. ही टाळाटाळ पिके करपायला कारणीभूत ठरत आहे. पिक विमा कंपन्यांच्या संदर्भात सरकारी यंत्रणेकडून हस्तक्षेप व्हावा आणि शेतकऱ्यांना मोबदल्याची रक्कम मिळावी. सोबतच खराब झालेले रोहित तात्काळ बदलून मिळावे, शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने किमान 8 तास दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे.  यावेळी आघाडी जिल्हा संघटिका सौ जिजाताई राठोड, विधानसभा संघटक अशोक इंगळे, तालुकाप्रमुख लखन गाडेकर, शहर प्रमुख हेमंत खेडेकर, वैद्य.आ. तालुका प्रमुख डॉ अरुण पोफळे, शहर संघटक जगदीश मानतकर, उप तालुका प्रमुख विजय इतवारे, अमोल शिंदे, किसान सेनेचे एकनाथ कोरडे, आशिष बाबा खरात, सुधाकर आघाव, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्ते, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे कोटावधी लाटले-बुधवत
शेतकऱ्यांना विम्या हप्त्यापोटी मिळत असलेली मदत तुटपुंजी आहे. मात्र विमा कंपन्यांनी यात कोट्यवधी रुपये लाटल्याचा जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी याप्रसंगी केला. तर शेतकऱ्यांनी भरलेल्या विमा हप्त्याच्या पोटी मिळालेली मदत ही ५० ते १०० रुपयापर्यंत आहे. काही ठिकाणी यापेक्षाही कमी आहे. विमा कंपन्यांची कार्यालय बंद आहेत. त्यामुळे ही होणारी फसवणूक थांबविण्याची मागणी बुधवत यांनी केली.