टाकळी पुलावर 25 वर्षीय युवकाची फाशी घेवून आत्महत्या

2329

Buldana News Update
विष्णु शिराळ..
मोताळा(7 Dec.2022) मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोस्टे.अंतर्गत असलेल्या टाकळी(वाघजाळ) पुलावर एका 25 वर्षीय युवकाने सुमन चांगदेव उबाळे यांचे शेत गट नं. 45 मध्ये दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज 7 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. युवकाचे नाव यादव उर्फअमर सोळंके असून तो वाघजाळ फाटा येथे राहत असल्याचे समजते.

प्राप्त माहितीनुसार वाघजाळ फाट्यापासून 500 मिटर व टाकळी शिवारात असलेल्या वाघजाळ-धा.बढे रोडवर वाघजाळ फाटा येथे राहणाऱ्या लोहार समाजाच्या यादव उर्फ अमर राजू सोळंके या 25 वर्षीय युवकाने सुमन उबाळे यांच्या गट नं.45मधील शेतात निंबाच्या झाडाल्या दोरीने फाशी घेतल्याने ढोरे चारणाऱ्या नागरिकांना दिसला. सदर युवक हा आकोट येथील असल्याची माहिती समोर आली आहे. तो वाघजाळ फाटा येथे राहतो. त्याने आत्महत्या का केली, हे मात्र समजु शकले नाही. त्याच्या पश्चात आई, वडिल, 3 भाऊ असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोस्टे.शिवाजी मोरे व राजेश हिवाळे घटनास्थळी दाखल झाले आहे.