‘ना भय ना भिती’तळणीत चालते राजरोसपणे अवैध दारु विक्री व वरली मटका !

1069

सरपंच व उपसरपंच, पोलिस पाटील व तंटामुक्ती अध्यक्षांसह ग्रामस्थांचे बोराखेडी ठाणेदारांना निवेदन

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (23.Apr.2023) मोताळा तालुक्यातील तळणी येथे चालत असलेली अवैध दारु विक्री व मटक्यामुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होवून गावातील सामजिक वातावरण खराब होवू शकते, सदर अवैध दारु व मटका बंद करण्याची मागणी तळणी सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्यावतीने शनिवार 22 एप्रिल रोजी बोराखेडी ठाणेदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

तळणी येथे सर्वजण गुण्यागोविंद्याने राहतात, प्रत्येकजण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो. परंतु येथे राजरोसपणे अवैध दारु विक्री व मटका चालत असल्यामुळे युवा पिढी मोठ्या प्रमाणात दारुच्या व्यसनाधिन होवून वरली मटक्याच्या नांदी लागले आहेत. त्यामुळे घराघरात पती-पत्नी, मुलांचे व वडिलांच्या भांडणाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गावातील दारु व मटका बंद होण्यासाठी तळणी ग्रामपंचायतच्यावतीने 23 मार्च 2023 रोजी ठराव घेवून तळणी येथील अवैध दारु विक्री व वरली मटका सुरु असल्यामुळे गावातील तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाधिन होण्याची शक्यता पाहता, गावातील दारु व मटका बंद करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. त्याची प्रत सुध्दा ठाणेदारांना देवून गावातील अवैध दारु विक्री व मटका बंद करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर तळणी ग्रामपंचायत सरपंच व्ही.एस.बोदडे, उपसरपंच सौ.जयश्री प्रविण नारखेडे, ग्रामपंचायत सदस्य संदिप झोपे, उध्दव नाफडे, किरण नाफडे, निलेश इंगळे, पोलीस पाटील गजानन नारखेडे, तंटामुक्ती अध्यक्ष संदिप झोपे, शेषराव बोदडे, प्रविण नारखेडे, प्रदीप नाफडे, प्रशांत नाफडे, मिलिंद बोदडे, बळीराम अंभोरे, प्रशांत बोदडे, सागर बोदडे, मिलिंद तायडे, संदिप जाधव, नितिन ब-हाटे, स्वप्नील नारखेडे, चेतन वाघोदे, विजय इंगळे, शे.मन्वर शे.इस्माईल, गजानन तायडे, शामराव गाढे, शे.मुस्ताक शे.अहमद, सुरेश बोदडे, वासुदेव बोदडे, कमलाबाई बाळु जाधव, नलु राजेंद्र जाधव, आत्माराम अंभोरे, गणेश जाधव, विजय जाधव, नामदेव अंभोरे, ओंकार अंभोरे, पुजांजी बोंडे, निळकंठ नारखेडे, बाबुराव खानंदे, विजय तायडे, दिपक तायडे, विशाल सुरडकर, आकाश चव्हाण, श्रीकृष्ण सातव, अर्चना प्रशांत बोदडे, राहुल बोदडे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

तळणीवासीय आंदोलनाच्या पावित्र्यात ?

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तळणी येथील अवैध दारु व मटका बंद न झाल्यास तळणी वासीयांच्यावतीने मोठे आंदोलन छेडल्या जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. ग्रामपंचायत प्रशासन, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व गावातील महिला-पुरुष दारु व मटका बंद न झाल्यास भविष्यात कोणत्या स्वरुपाचे आंदोलन छेडतात ? हे ही पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

हफ्ते देतो म्हणून दारु विकतो !

जिल्ह्यात जवळपास सर्वच गावामध्ये अवैध देशी, विदेशी व गावठी दारु विकली जाते. यासाठी मोठ्या प्रमाणात हप्ते चालू असल्याने कोणत्याही प्रकारची कारवाई पोलिस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून केली जात नसल्याची चर्चा असून अनेक महिलांनी याला दुजोरा सुध्दा दिला आहे. दारु विक्री थांवावी म्हणून बोराखेडी पोस्टे.अंतर्गत असलेल्या भाडगणी गावातील महिलांनी भर दिवाळीच्या दिवशी पोस्टे.मध्ये धडक देवून ‘हप्ते देतो म्हणून दारु विकतो’ याबाबतची आपबिती तत्कालीन ठाणेदार राजेंद्र पाटील यांच्यासमोर मांडून कारवाई करण्याची मागणी केली होती.