चिंचपूर येथील 19 वर्षीय युवती बेपत्ता !

82

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (6.JULY.2023) मोताळा तालुक्यातील चिंचपूर येथील 19 वर्षीय युवती 3 जुलै रोजी शाळेतून दाखल आणते असे सांगून गेली परंतु ती परत आलीच नाही. याबाबत आज 6 जुलै रोजी बोराखेडी पोस्टे.ला मिसींग दाखल करण्यात आली आहे. बेपत्ता झालेल्या युवतीचे नाव कु.वैष्णवी विनोद बहरुपे असे आहे.

विनोद बहरुपे यांनी बोराखेडी पोस्टे.ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची मुलगी कु.वैष्णवी बहरुपये (वय 19) ही चिंचपूर येथून मोताळा येथील बबनराव देशपांडे विद्यालय येथून शाळा सोडण्याचा दाखला आणण्यासाठी जाते, असे सांगून 3 जुलै रोजी सकाळी 9 वाजता घरुन निघून गेली, ती परत न आल्याने तिचा नातेवाईक व आजुबाजूला शोध घेतला असता, मिळून आली नसल्याने आज गुरुवार 6 जुलै रोजी मिसींग दाखल करण्यात आली आहे. युवतीचा रंग गोरा, केस काळे, चेहरा लांबट, उंची 162 सेमी, अंगात लाल कलरचा पंजाबी ड्रेस असे वर्णन आहे. पुढील तपास बोराखेडी पोलिस करीत आहे.