गुरुवार व शुक्रवारी जिल्ह्यात उध्दव ठाकरेंची तोफ धडाडणार

60

सहा सभांचे आयोजन; साहेब काय बोलतात ? उत्सुकता शिगेला !

मोताळा(BNU न्यूज नेटवर्क) उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेबांचा जिल्ह्यात सहा ठिकाणी जनसंवाद लोकसभा दौरा 22 व 23 फेब्रुवारी रोजी आयोजीत करण्यात आला आहे. सभेत साहेब काय बोलतात ? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले असून उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

बुलढाणा विधानसभा मतदार संघामध्ये लिड देणाऱ्या मोताळा तालुक्यात दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून शहरामध्ये ठिकठिकाणी फ्लेक्स बोर्ड लावण्यात आली असून भगव्या झेंड्यांनी शहर भगवेमय झाले आहे. मलकापूर रोडवरील बुलडाणा अर्बन जवळील मैदानावर दुपारी 3 वाजता सभा आयोजीत करण्यात आली आहे. सभेसाठी 120 मंडप टाकण्यात आले असून बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. उध्दवजी ठाकरे साहेब, मोताळा तालुक्यात पहिल्यांदाच येत असल्यामुळे आतापर्यत शिवसेनेला लिड देणाऱ्या मतदार संघातील मोताळ्याच्या सभेत साहेब काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

2019 लोकसभेत भाजपा-सेना युतीला झालेले मतदान

2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा-शिवसेना युतीला बुलढाणा विधानसभा मतदार संघामध्ये 82030, खामगाव विधानसभा 88253, सिंदखेड राजा 83647, चिखली 89474, जळगाव जामोद मतदार संघामध्ये सर्वाधीक 92944 तर मेहकर मतदार संघामध्ये 84190 व पोस्टल 1440 असे एकूण 521978 मतदान झाले होते, हे विशेष!