‘त्या’ गंभीर कारणातून त्याने पोलिसावर चालविली गाडी

60

मोताळा-नांदुरा रोडवरील फुली शिवारातील घटना

BNU न्यूज नेटवर्क
मोताळा(3 JAN.2024) ‘त्या’ पठ्ठयाने एका गंभीर कारणावरुन पोलिस अंमलदारावर नांदुरा मोताळा रोडवरील फुली शिवारात 30 डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास दुचाकीवर स्वीफ्ट गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. बिचाऱ्या ‘त्या’ पोलिसाच्या फिर्यादीवरुन आरोपीवर बोराखेडी पोस्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदुरा येथील पोलिस अंमलदार मोहन करांगळे यांनी बोराखेडी पोस्टे.ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, तो पोलिस मुख्यालय बुलढाणा येथे कर्तव्यावर आहे. आरोपी व फिर्यादीचे जुने वाद असून फिर्यादीवर शेगाव पोस्टे.ला गुन्हा दाखल आहे. करांगळे हा दुचाकी क्र.एम.एच.28.अेपी.7661 ने नांदुरा येथून बुलढाण्याकडे 30 डिसेंबर रोजी जात होता. ‘त्या’ गंभीर कारणावरुन फिर्यादीस ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपी दिपक तुळशीराम बासोडे नांदुरा याने नांदुरा ते मोताळा रोडवरील फुली शिवारात स्वीफ्ट गाडी क्र.एम.एच.28 बीके.6573 ने करांगळे याच्या दुचाकीला मागून धडक देवून 40 ते 50 फूट फरफटत नेवून जीवाने मारण्याच्या उद्देशाने जखमी केले. अशा फिर्यादीवरुन आरोपी दिपक बासोडे याच्यावार बोराखेडी पोस्टे.ला भादंवीचे कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस करीत आहे.