सिंदखेड शिवारात इसमाचा मृतदेह आढळला

60

BNU न्यूज नेटवर्क
मोताळा(3 JAN.2024) रात्री कपाशीला पाणी देण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना आज बुधवार 3 जानेवारी रोजी सिंदखेड शिवारात उघडकीस आली. विष प्राशनाने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे.

पोलिस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार धा.बढे पोस्टे.अंतर्गत असलेल्या सिंदखेड येथील गोपाल जगन्नाथ शिंदे (वय 55) हे 2 जानेवारी रात्री कपाशीला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. सकाळी भाऊ घरी दिसला नसल्याने श्रीकृष्णा शिंदे रस्त्याने जात असतांना त्यांना सिंदखेड शिवारात गोपाल शिंदे हे रस्त्यात विषप्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आले, अशा श्रीकृष्णा शिंदे यांच्या फिर्यादीवरुन धा.बढे पोस्टे.ला मर्ग दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकाँ.अरुण मापारी हे करीत आहे.