151 जणांनी रक्तदान करुन केले स्व.राणा चंदनला अभिवादन

161

स्वाभिमानीच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!
बुलडाणा-(BNU न्यूज)-विद्यार्थी, तरुण, शेतकरी व सर्वच क्षेत्रातील नागरिकांच्या ताईत असलेला सर्वांच्या मदतीसाठी कायम कार्यतत्पर असणारा तो म्हणजे स्व.राणा चंदन हे नाव बुलडाणा शहरासह जिल्ह्यात सर्वश्रृत आहे. राणा रुग्णांना रक्त मिळवून देण्यासाठी अर्ध्यारात्रीही धाऊन जाणारा रोडवरील सच्चा समाजसेवी होता. त्या राणाला जावून एकवर्ष पूर्ण झाले. स्व.राणा चंदन यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमीत्त राणाचे रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्वाभिमानी हेल्पाईन सेंटर बुलढाणा येथे आयोजित रक्तदान शिबिरात १५१ जणांनी रक्तदान करुन राणाला आदरांजली अर्पण केली.

अडल्या, नडल्यांच्या व सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धाऊन जाणारा, गोरगरीबांच्या रुग्णांना वेळेवर रक्त मिळून देण्यासाठी स्वत:रक्ताच पाणी करणारा स्व.राणा चंदन, राणा विद्यार्थी, शेतकरी, मजूर व युवकांचा हक्काचा नेत्याला काळाने वर्षभरापूर्वी हिरावून घेतले. त्यांचे कार्य आणि त्यांच्या स्मृती कायम राहो, यासाठी त्यांना प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदानातून श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या मार्गदशनाखाली ११ सप्टेंबर रोजी स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 151 जणांनी रक्तदान स्व.राणाजींना आदरांजली अर्पण केली. रक्तदान शिबिराचे उद्घाटन बुलढाणा अर्बनेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्व. राणा चंदन यांच्या पत्नी किरण चंदन व मातोश्री शांताबाई चंदन यांची विशेष तर Adv. शर्वरीताई तुपकर, व्हाईस ऑफ मीडियाचे विदर्भ अध्यक्ष अनिल म्हस्के, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे, निलेश जोशी, भगवानराव मोरे, बबनराव चेके यांच्यासह शहरातील सर्वच क्षेत्रातील नागरिक व संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रक्तदान शिबिराला विद्यार्थी, युवक, महिला, शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मान्यवरांनी केले अभिवादन…
माजी जि. प. सभापती दिलीप जाधव, रा.कॉं.चे नेते नरेश शेळके, काँग्रेस नेते दत्ता काकस यांच्यासह विविध मान्यवरांनी देखील या शिबिराला भेट देऊन स्व.राणा चंदन यांना अभिवादन केले.

यांनी केले रक्तदान..
रक्तदान शिबिरामध्ये डॉ.ज्ञानेश्वर टाले, नितीन राजपूत, विजया कोळसे, पुष्पा सपकाळ, सुनंदा धोरण, संगीता चंदन, पूनम पाटील, शे.रफिक शे.करीम, पवन देशमुख ,दत्तात्रय जेऊघाले, प्रदीप शेळके, सैय्यद वसीम, दत्ता पाटील, आकाश माळोदे, संजय खारे, शेख जुल्फेकार, मधुकर शिंगणे, वसंतराव दहातोंडे, रामेश्वर अंभोरे, अंकुश सुसर, भागवत धोरण, रशीद पटेल, अनिल पडोळ, सुधाकर तायडे, कैलास जाधव, अविनाश डुकरे, अमोल बाहेकर, संजय तुपकर , ज्ञानेश्वर कणखर, गोपाल जोशी ,गजानन चंदन, राजेश बाहेकर, गोपाल जेऊघाले, सुदंशु जेऊघाले, धनंजय जेऊघाले, भरत गव्हाणे, आकाश तुपकर, विश्वास शेळके, सुनील टेकाळे, परमेश्वर पाटील, भगवान उबरहंडे, गणेश गायकवाड, विजय गायकवाड, राहुल वाघ, महादेव लाड ,शुभम फेंगडे, नितीन सोनटक्के, अमोल वाघमारे, रमेश सिरसाट, मधुकर थिगळे, श्याम धंदर, उत्तम खरात, प्रमोद टेकाळे, अंबादास मोरे, दत्तू पंडित, सदानंद माळोदे, आदेश काडेंलकर, भीमराव हिवरकर, रामेश्वर हिवरकर, पवन काकडे, विनोद आडवे, सीताराम जगताप, अनिल टेकाळे, विशाल जाधव, युवराज गोगल, अमेय सावजी, शाहरुख खान, राजाराम शिंदे, नारायण जाधव, जुबेर पटेल, मुकुंदा शिंबरे, किशोर शेळके, श्रीकांत चौधरी, संजय शिंदे, रमेश जोशी, चेतन जेऊघाले, निर्मल परदेशी, आकाश घनवट, सलीम शहा, हिम्मतराव तायडे, विनायक सरनाईक यांच्यासह आदी अश्या १५१ जणांनी रक्तदान करुन स्व.राणा चंदन यांना आदरांजली अर्पण केली. जिल्हा रुग्णालयातील शासकीय रक्तपेढी व डॉ.अजित सिरसाट यांच्या लिलावती ब्लड बँक यांनी रक्त संकलनाचे काम केले.