मोताळा- शहरात एमटीएम फोडून 7 लाखाची कॅश लंपास केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली होती. या घटनेची शाई वाळते ना वाळत चोरट्यांनी आपला मोर्चा तालुक्यातील डिडोळा बु.गावाकडे वळवित येथे 17 मे च्या रात्रीच्या सुमारास घराची कुलूप तोडून रोख रकमेसह 79 हजार 500 रुपयांचे सोन्याचे दागिणे लंपास केल्याची घटना सकाळी 4 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
बोराखेडी पोलिस स्टेशन हद्दीत चोरींच्या घटनेत दिवसेनदिवस मोठी वाढ होत आहे. तर दुसरीकडे चोरट्यांना पकडले जात नसल्यामुळे त्यांची हिंमत वाढल्याने ते चोरींच्या घटनेंना अंजाम देत आहे. 16 ते 17 मे च्या दरम्यान चोरट्यांनी डिडोळा बु.येथील विजय उर्फ नंदकिशोर सुगदेव खंडागळे यांचे घर टारगेट करीत घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत सोनेच्या गहु मण्याची 11 ग्रामची पोत किंमत 76 हजार तसेच नगदी रोख 3 हजार 500 रुपये असा एकूण 79हजार 500 रुपयांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. विजय खंडागळे यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द भारतीय न्याय संहिता 2023 कलम कलम 305, 331(4) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकाँ.अमोल खराडे हे करीत आहे.



























