Saturday, April 18, 2026
Home Buldana अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा- ना.प्रतापराव जाधव यांचे...

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा- ना.प्रतापराव जाधव यांचे प्रशासनाला निर्देश

32

बुलढाणा(शासकीय वार्ता) जिल्ह्यात 18 व 19 मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य व कुटुंब राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. त्यामुळे गहू, कांदा, मका, ज्वारी, मोसंबी, केळी व डाळिंब पिकांचे नुकसान झाले. यामध्ये जळगाव जामोद तालुक्यात 41 गावे बाधित झाली असून 950 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. मलकापूर तालुक्यातील 42 गावे बाधित झाले असून 750 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. खामगाव तालुक्यातील 20 गाव बांधीत होऊण 148 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. चिखली तालुक्यातील 18 गावे बधीत होऊन 712 हेक्टर वरील पिकांचा नुकसान झाले. मोताळा तालुक्यातील 16 गावातील 102 हेक्टर, नांदुरा तालुक्यातील 15 गावतील 210 हेक्टर, बुलडाणा तालुक्यातील 14 गावातील 145 हेक्टर, देऊळगाव तालुक्यातील 12 गावातील 550 हेक्टर, संग्रामपूर तालुक्यातील 11 गावातील 70 हेक्टर, लोणार तालुक्यातील 10 गावतील 190 हेक्टर असे 3802 क्षेत्र अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे बाधित झाले आहे. या सर्व बाधीत क्षेत्राचे पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देश केद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागला दिले आहे.

Don`t copy text!