मोताळा: अनेक गुन्ह्यात गुन्हेगारांना वाटते माझ्यापेक्षा कोणीच हुश्श्यार नाही. परंतु त्या गुन्हेगांरापेक्षा पोलिसांच नेटवर्क पावरफुल्ल असल्याचे बोराखेडी पोलिसांनी दाखवून देत 21 वर्षीय गांजा विकणाऱ्या युवकाकडून 2 लाखाचा 9 किलो 800 ग्रॅम गांजा जप्त करुन अजय मोहिते यांच्या आज रविवार 5 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास मुसक्या आवळल्या.
मोताळा शहरातील नांदुरा रोडवरील कॉटन मार्केट गाजांचे हब बनते का? अशी मोताळ्यात चर्चा आहे. येथून लाखोच्या गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी झाली असून होत आहे. येथे राहणाऱ्यांना कधी चिखली, कधी मोताळा तर कधी इतर राज्यात पकडल्याच्या पोलिसात नोंदी आहेत. याच कॉटन मार्केट परिसरात राहणारा 21 वर्षीय अजय रोहिदास मोहिते याने गांजा विक्री करण्यासाठी घरामध्ये गांजा साठविल्याची माहिती बोराखेडी पोलिसांना गोपनीय सुत्रांकडून मिळाली होती. बोराखेडी पोलिसांनी अॅक्शन मोडवर येत पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधिर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बोराखेडी पोलिस निरीक्षक सिताराम मेहेत्रे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरिक्षक बालाजी शेंगेपल्लू, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र कपले, हेकाँ.नंदकिशोर धांडे, अमोल खराडे, सुपडसिंग चव्हाण, श्रीकांत चिटवार, विजय सुरडकर, मनोहर पंडीत, अनिता मोरे, प्रमोद साळोक, रविंद्र नरोटे, आकांक्षा जऱ्हाड यांच्या पथकाने 5 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता घटनास्थळी दस्तक देत 21 वर्षीय अजय रोहिदास मोहिते याच्या घरी धाड टाकून त्याच्या घरातून 1 लाख 96 हजार रुपयांचा 9 किलो 800 ग्रॅम जप्त करीत अजय मोहिते याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. याप्रकरणी पीएसआय राजेंद्र कपले यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी सदर युवकावर एनडीपीएस कलम 8 (क), 20 (ब) (II) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एपीआय बालाजी शेगेंपल्लू करीत आहे.
मोताळ्यात गांजा येतो कुठून?
कॉटन मार्केट मध्ये राहणाऱ्या काही लोकांना मोताळा तालुक्यासह इतर तालुके व राज्यात गांजाची तस्करी करतांना पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून गांजा जप्त केल्या जातो, मात्र त्यांना गांजा पुरविणारा त्यांचा मास्टरमाईंड ‘आका’ कोण ? याचा पोलिसांनी शोध गरजेचे आहे, अन्यथा कॉटन मार्केट परिसर एकदिवस गांजांचे मोठे केंद्र होईल, एवढे मात्र निश्चीत!


























