Monday, April 20, 2026
Home Buldana शासकीय ,धार्मिक व शैक्षणिक संस्थातील कार्यालयाचे कॅबिन पारदर्शी हवेत ! कार्यालयीन वेळेत...

शासकीय ,धार्मिक व शैक्षणिक संस्थातील कार्यालयाचे कॅबिन पारदर्शी हवेत ! कार्यालयीन वेळेत दरवाजे उघडेच ठेवा; प्रभाकर वाघमारे यांची मागणी

39

बुलढाणा- नाशिक मधील तथाकथीत नराधम भोंदू बाबा म्हणून ओळख असलेला कॅप्टन अशोक खरात याच्या गिधाड वासनांध खेळाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. त्या नराधम बुटक्याने अनेक महिलांची लैंगिक शोषण केल्याच्या 100 पेक्षा अधीक व्हीडिओ क्लीप बाहेर आल्या असून तो अश्लील क्लीप बनून महिलांना ब्लॅकमेल करीत असल्याच्या उद्देशाने सदर व्हीडिओ पेनड्राईव्ह मध्ये ठेवल्याची माहिती समोर आली आहे. अशा प्रकरणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासकीय कार्यालय, धार्मिक स्थळे व शैक्षणिक संस्थातील कार्यालयाचे कॅबिन पारदर्शी हवे, कार्यालयीन वेळेत दरवाजे उघडेच ठेवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर वाघमोर यांनी केली आहे.

या किळसवाण्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. त्यातच लिंगपिसाट खरात बाबाच्या भक्तात मोठमोठ्या महिला असल्याने हे प्रकरण पाहिजे तेवढे सोपे दिसत नाही. यामध्ये खुप खोलवर निपक्षपणे तपास झाल्यास खरे प्रकरण उघडकीस येईल. यापूर्वी एका राज्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची कॅबीनमध्ये असेच व्हीडीओ व्हायरल झाला होते आणि नाशिक येथील व्हायरल झालेल्या व्हीडिओत कॅबिनमध्ये काय चालते आहे हे स्पष्ट दिसत असल्यामुळे अनेक आलिशान बांधण्यात आलेल्या कॅबिनमध्ये काही वाईट प्रवृत्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कॅबिनमध्ये काय चालत असावे याच्यावर मोठ्या प्रमाणात संशय निर्माण होऊ लागला आहे. शासनाने महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालय , धार्मिक स्थळे शैक्षणिक स्थळे व इतर महत्त्वाच्या संस्था यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कॅबिन ह्या पारदर्शी असाव्या जेणेकरून जे काही प्रमाणात वाईट प्रवृत्तीचे शासक प्रशासक असतील तर अशा ठिकाणी त्यांचे कारनामे थांबतील. अनेक ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना घडणार नाही काही वरिष्ठ अधिकारी हे त्रास देण्याच्या उद्देशाने किंवा एकल महिला असल्याचा फायदा घेऊन कॅबिनमध्ये मुद्दाम थांबवून ठेवतात असे प्रकार थांबतील. तोव शासनातील सर्व चारचाकी वाहनाला लावलेल्या काचावरील काळी फीत काढून ते चार चाकी वाहन सुद्धा पारदर्शक बनवावे, जेणेकरून वाहनांमध्ये सुद्धा विनाकारण त्रास देण्याचे प्रकार थांबतील, एवढे मात्र निश्चीत!

महाराष्ट्र शासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील कॅबीन पारदर्शी केल्यास खऱ्या अर्थाने सरकार व त्यामधील अधिकारी पारदर्शी ठरतील, व अशा घटना कमी होतील. यासाठी शासकीय कार्यालय, धार्मिक स्थळे व शैक्षणिक संस्थातील कार्यालयाचे कॅबिन पारदर्शी हवेत, अशी मागणी छेडछाडविरोधी पथकाचे कार्यकारी प्रमुख राहिलेले व त्या क्षेत्रात काम केलेले महाराष्ट्र शासनाच्या महिला अत्याचार विरोधी निर्भय पुरस्कार प्रस्तावित तथा महाराष्ट्र शासनाचे सामाजिक क्षेत्रातील जिल्हायुवक पुरस्कार प्राप्त प्रभाकर वाघमारे यांनी सरकारकडे केली आहे.

Don`t copy text!