
मोताळा : तालुक्यातील टाकळी (वाघजाळ) येथे श्रीक्षेत्र महादेव संस्थान येथे ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद् भागवत कथेचे २३ ते ३० मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. कथावाचन हभप.गोपाल महाराज कचोरे डिडोळा तर पारायण वाचन ज्ञानेश्वर महाराज शिराळ हे करणार आहेत. सप्ताहाचे हे २३ वे वर्ष आहे.
दैनंदिन कार्यक्रम सकाळी ५ ते ६ काकडा आरती, ७ ते १० श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण, १० ते १२ श्रीमद् भागवत कथा, दुपारी २ ते ३ प्रवचन, ३ ते ५ श्रीमद् भागवत कथा, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ८.३० ते १०.३० किर्तनाचे कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहेत. हभप.वासुदेव महाराज शास्त्री वाघजाळ आश्रम यांच्या प्रमुख मार्गदर्शनात सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.सोमवार २३ मार्च रोजी हभप.श्रीराम महाराज पाटीळ चाळीसगाव, २४ मार्च रोजी हभप.श्रीकांत महाराज मोरखेड, २५ मार्च हभप.शिवदास महाराज राहणे पान्हेरा, २६ मार्च हभप. योगीनीताई वसतकार येरळी, तर रात्री १० ते १२ हभप.वासुदेव महाराज शास्त्री यांचे रामजन्म उत्सवाचे किर्तन, २७ मार्च हभप.गजानन महाराज कोल्हे काकोडा, २८ मार्च हभप.ज्ञानेश्वर महाराज महाले डिघी, २९ मार्च हभप.राम महाराज गाडेकर शेलूद, ३० मार्च हभप.सारंगधर महाराज गोळेगाव यांचे सकाळी १० ते १२ वेळेत काल्याचे किर्तन आयोजीत करण्यात आले आहे.भागवत कथेचा पंचक्रोशीतल भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन श्रीक्षेत्र महादेव संस्थान व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

























