Saturday, May 23, 2026
Home Buldana व्यवहारे पाटील कुटुंबीयांचा स्तुत्य निर्णय; आईच्या तेरवीचा खर्च देणार मंदिर व...

व्यवहारे पाटील कुटुंबीयांचा स्तुत्य निर्णय; आईच्या तेरवीचा खर्च देणार मंदिर व अनाथाश्रमाला दान !

39

गणेश वाघ
मोताळा- मृत्यू हे अंतिम सत्य आहे, माणूस खाली हात येतो अन् खाली हात जातो. राहतात फक्त त्या आठवणी…आईच्या आठवणी जोपासण्यासाठी व समाजात चालत आलेल्या रुढी, परंपरांना तिलांजली देत बुलडाणा अर्बन मोताळा शाखा व्यवस्थापक श्रीकृष्णा पाटील यांनी एक स्तुत्य निर्णय घेतला. त्यांनी आई श्रीमती सुशिलाबाई वामनराव पाटील यांच्या तेरवीचा विधी न करता ते पैसे अनाथआश्रम व मंदीराला देणगी स्वरुपात देण्याचा निर्णय घेवून समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे.

श्रीकृष्णा व्यवहारे यांचे मूळगाव मोताळा तालुक्यातील पोफळी हे आहे. सध्या ते नोकरीनिमित्त मोताळा येथे स्थायीक झाले आहे. त्यांनी बुलडाणा अर्बन मोताळा शाखेत शिपाई पदावर काम करीत आपल्या कामाची चुणूक दाखवित त्यांनी आपले काम कर्तव्यनिष्ठेनेने पार पाडल्याने त्याची पोचपावती ते आज बुलडाणा अर्बन मोताळा शाखा व्यवस्थापक आहे. गरीबी त्यांनी जवळून पाहिली आहे. त्यांची आई सुशिलाबाई वामनराव पाटील यांचे 17 मार्च रोजी वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. सामाजात सामाजिक परंपरेनुसार तेरवी निमित्त मोठ्या प्रमाणावर भोजन, पाहुणचार तसेच विधिवर मोठ्या प्रमाणात खर्च केल्या जातो. मात्र, श्रीकृष्णा पाटील यांनी या परंपरेला फाटा देत तेरवीचा खर्च समाजपयोगी कार्यासाठी करण्याचा निर्णय घेतला, आणि तो प्रत्यक्ष अमलात देखील आणला. आई नेहमी स्मृतीत राहावी, यासाठी तेरवीचा खर्च टाळून तो अनाथआश्रम व मंदीराला दान देण्याच्या श्रीकृष्ण पाटील यांच्या सकारात्मक निर्णयाचे कौतूक होत आहे.

सकारात्मक बदल घडविण्याची प्रेरणा

दिवंगत व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ काहीतरी अर्थपूर्ण आणि समाजाला उपयोगी पडेल असे काम करणे महत्वाचे आहे. श्रीकृष्ण पाटील यांच्या या कृतीमुळे समाजात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा मिळत असून, इतरांनीही त्यांचा हा आदर्श अंगीकारल्यास समाजातील आर्थिक संसाधनांचा योग्य वापर होऊन गरजू घटकांना मदत मिळेल, एवढे मात्र खरे!

Don`t copy text!