Saturday, April 18, 2026
Home Buldana नारीची पुजा होते तेथे देवता वास करतात- साध्वी सृष्टीलताजी

नारीची पुजा होते तेथे देवता वास करतात- साध्वी सृष्टीलताजी

15

बुलढाणा-सद्भावना सेवा समिती द्वारा आयोजित संगीतमय राम कथेस 7 एप्रिलपासून अयोध्याधाम, लहाने लाऊट मैदानावर दुपारी 2 ते 6 या वेळात सुरु आहे. प्रथम पुष्प गुंफतांना साध्वी सृष्टीलता रामायणीजी यांनी भारतीय नारीची महत्ता सांगताना अनेक दृष्टांत देत. “यत्र नार्यस्तु पूज पूजन्ते रमन्ते तत्र देवता” जिथे नारीची पुजा होते तिथे देवता वास करतात म्हणून नारीचा सन्मान करावा, असे उद्गार साध्वी सुष्टीलताजी यांनी रामकथेचे प्रथम पुष्प गुंफतांना काढले.

कथेच्या प्रारंभी सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी पंचवीस वर्षापासूनचा विविध कथांचा आढावा घेतला. रामकथेचा लाभ घेण्याचा आवाहन केले. तर उपाध्यक्ष राजेश देशलहरा यांनी समितीच्या लोगोचे (बोधचिन्ह) विमोचन केले. व्यासपीठावर मुख्य यजमान रतनलाल निरंजन वर्मा, ओम आनंद ज्वेलर्स परिवार, सौ शांताबाई वर्मा, दीपक वर्मा, सौ किरण वर्मा, पंकज अग्रवाल, सौ सपना अग्रवाल, श्रीमती सरलादेवी अग्रवाल, रितेश अग्रवाल, डॉ. सुकेश झंवर, सौ कोमलताई झंवर यांनी साध्वीजींचे व रामायण ग्रंथाचे पूजन केले व आरतीमध्ये सहभाग घेतला. सौ. संगीता बाहेती, प्रेमा राठी, यांनी स्वागत केले माहेश्वरी समाज महिला मंडळांनी सामूहिक आरती केली. कथेवर आधारित प्रश्नमंजुषा अंजली परांजपे यांनी घेतली विद्यार्थ्यांनी उत्तरे दिली. सर्व पत्रकार बंधूंनी व्यापक प्रसिद्धी दिल्याबद्दल साध्वीजींनी मनापासून त्यांचे आभार व्यक्त केले.पंचवीस वर्षापासून समिती सत्संग घेत असलेल्या प्रयत्नाचे कौतूक केले.

तुलादान करण्यासाठी भाविकांनी पुढे यावे– राजेश देशलहरा

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, पंढरीचा पांडुरंग भक्तांच्या चरणांची धूळ मस्तकी धारण करतो. असे वर्णन करून “सुंदर ते ध्यान उभे विटेवरी” हा अभंग गायीला तेव्हा कथा मंडपात श्रोत्यांमध्ये उत्साह संचारला. आज सकाळी दैनिक यजमान अमित काळकर, रामनिवास यादव उत्सव यजमान व मुख्य यजमान दीपक वर्मा यांनी परिवार सहित पूजन करून आरती केली . साध्वी सृष्टीलताजी कथा मंडपाच्या प्रवेशद्वारावर येतात रामायण ग्रंथ डॉ. सुकेश झंवर आणि सौ कोमलताई झंवर यांच्याकडे सोपविला. डॉ. सुकेश झंवर यांनी साध्वीजी सोबत व्यासपीठापर्यंत नेला विधीवत पूजन स्वागत व माल्यार्पण करून कथेला प्रारंभ केला.शहरात आगमन प्रसंगी महिला शक्तीने स्कूटर रॅली काढून स्वागत तसेच रामकथेमध्ये सर्व समाजाच्या महिला मंडळाचा सहभाग असल्याचे साध्वीजींनी खूप कौतूक केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकारणी, विशेष परिश्रम घेत आहे. तुलादान करण्यासाठी भाविकांनी पुढे यावे, असे आवाहन एआरडी परिवाराचे राजेश देशलहरा यांनी केले.

Don`t copy text!