बुलढाणा: केंद्रीयमंत्री असावातर प्रतापराव जाधव यांच्यासारखा त्याला कारणही तेवढेच मोठे आहे. ना.प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नामुळे बुलढाणा जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये 10 ठिकाणच्या ग्रामीण क्षेत्रांमध्ये नॅशनल बँकांच्या नविन शाखा सुरू करण्याबाबत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मान्यता दिली आहे. यासाठी ना.जाधव यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून आता ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीयकृत बँका सुरु होणार आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना राष्ट्रीयकृत बँकेची सेवा मिळावी या दृष्टिकोनातून राष्ट्रीय बँकेच्या अधिकाऱ्यां सोबत केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी बैठक घेतली होती. या बैठकीत ज्या ग्रामिण ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकाच्या शाखा नाहीत अशा ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा सुरु कराव्यात असे निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे मांगणी सुध्दा करण्यात आली होती.
पुर्वी जिल्हा केंद्रीय बँकेच्या जिल्हाभरात शाखा असल्याने शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या वतीने विनासायास पीक कर्ज मिळत होते. परंतु जिल्हा बँकेच्या शाखा बँक अवसायानात गेल्याने बंद पडल्या त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिककर्जासाठी खाजगी सावकारांकडून अव्वाच्या सव्वा व्याजाने कर्ज घ्यावे लागते. जिल्हयामध्ये राष्ट्रीयकृत बँकाच्या शाखांची अजुनही गरज असल्याने जिल्हा बँकाच्या बंद पडलेल्या शाखांच्या ठिकाणी तसेच जास्त लोकसंख्यांच्या गावांमध्ये सर्वे करुन राष्ट्रीयकृत बँकाच्या शाखा सुरु करण्याबाबत ना.प्रतापराव जाधव यांनी सदरहु बैठकीत निर्देश दिले आहे. त्या अनुषंगाने आता नव्याने सर्वे होवुन इतर बँकांच्या शाखा सुद्धा जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागामध्ये सुरू होणार आहे.
येथे होणार राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा
बुलढाणा तालुक्यातील सागवान आणि साखळी बुद्रुक चिखली तालुक्यातील इसोली, सवना येथे तर खामगाव तालुक्यातील घाटपुरी व सुटाळा खुर्द, मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक व देऊळगाव साकर्शा, मोताळा तालुक्यातील कोथळी आणि संग्रामपूर तालुक्यातील टुनकी बुद्रुक येथे लवकरच राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा सुरू होऊन या भागातील नागरिकांना सेवा सुविधा मिळणार आहे.
ना.जाधव यांनी मानले अर्थमंत्री निर्मला सितारामण यांचे आभार
बुलढाणा जिल्हयातील ग्रामिण व शहरी भागात नविन राष्ट्रीयकृत शाखांना केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मान्यता दिल्याने ना.प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारामण यांचे आभार मानले आहे. ग्रामीण भागातील जिल्हा बँकेच्या बंद झालेल्या शाखेच्या ठिकाणी तसेच मोठया गावात राष्ट्रीयकृत बँका सुरु करण्याची मागणी अर्थ मंत्रालयाकडे केली होती या मागणीला मान्यता मिळाली आहे त्यामुळे लवकरच या शाखा ग्रामीण क्षेत्रांमध्ये कार्यान्वित होणार आहे.


























