अज्ञात वाहनाने दुचाकीला उडविले; 2 ठार, 1 जखमी

65

दाताळा पिंप्री गवळी रोडवरील घटना

मोताळा-जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अशीच एक घटना आज 22 डिसेंबर रोजी दाताळा ते पिंप्री गवळी मार्गावर दाभाडी जवळ सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये दुचाकीवरील 2 जण जागीच ठार झाले. तर एकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

मलकापूर येथून क्र.एम.एच.28 बीएम-2173 दुचाकीने शेख रशीद शेख कालु (वय 55), शेख अमीन शेख हनिफ (वय 47) व शेख सलीम खा बुढन खा (वय 30) हे आज शुक्रवार 22 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास मिस्त्री काम करुन गावी माकोडीकडे परत येत होते. दरम्यान दाताळा पिंप्री गवळी रोडवरील दाभाडी येथे अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत शेख अमीन शेख हनीफ व शेख रशीद शेख कालू यांचा मृत्यू झाला. तर सलीम खा बुढण खा हा जखमी झाला आहे. वृत्तलिहेपर्यत गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता.