मुर्ती फाट्यावर भिषण अपघात; 1 जागीच ठार

1679

Breaking News
Buldana News Update
अभय जंगम..
बुलढाणा(7Dec.2022) बुलढाणा रोडवरील मुर्ती फाटा येथे आज सायंकाळी 7.45 वाजेच्या दरम्यान भरधाव ट्रकने एका दुचाकीस जबर धडक दिली. धडक एवढी भिषण होती की, या धडकेत दुचाकीवरील गजानन दातार हे जागीच ठार झाले. तर संतोष जोशी यांच्यावर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार करुन पुढील उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाच्या वतीने डॉ.वासे यांनी ‘बुलडाणा न्यूज अपडेट’चे प्रतिनिधीशी बोलतांना दिली.

मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा तालुक्यातील साखळी बु.येथील संतोष जोशी व चिखली तालुक्यातील सवणा येथील गजानन दातार यांचे मोताळा तालुक्यातील परडा शिवारात मेंढयांचे कळप (वाडे)आहेत. ते दोघे आज 7 डिसेंबरच्या सायंकाळी बुलढाणा येथून एच.एफ.डिलक्स गाडी क्र.एम.एच.28 अे.क्यू 3316 या दुचाकीने येत असतांना त्यांना मुर्ती फाट्यावर बुलढाणाकडे जाणाऱ्या भरधाव ट्रक क्र.टी.एन.20 बी.ए.1694 ने जबर धडक दिली. धडक भिषण असल्याने या धडकेत गजानन दातार (वय 50) हे जागीच ठार झाले, तर संतोष जोशी (वय 32) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने 108 वाहनाने बुलढाणा येथे उपचारार्थ दाखल केले. संतोष जोशी यांच्यावर जिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचार केले. त्यांना अनेक ठिकाणी फ्रॅक्चर असल्याने पुढील उपचारार्थ अकोला येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती जखमींचे नातेवाईक व रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. वृत्तलिहेपर्यंत घटनेची पोस्टे.ला नोंद नव्हती.