‘ब्रेक निकामी’राजूर घाटात बस पलटी; 8 जखमी

621

1.चालकाच्या प्रसंगवधानाने मोठा अनर्थ टळला
2.भंगार बसेसचा प्रवाश्यांच्या जिवाशी खेळ
3.कालबाह्य बसेस धावतात रोडवर

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (23 FEB.2023) एसटी.बसचा प्रवास सुखाचा प्रवास, तासभर थांबीन पण एसटीनेच जाईल, हात दाखवा बस थांबवा, सेवेसाठी सैदव तत्पर व प्रवाशांच्या सुरक्षेची हमी देणाऱ्या एसटी.बसचा प्रवास अनेकवळा प्रवाश्यांच जीवावर बेतला आहे. असाच एक प्रकार आज 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.45 वाजेच्या बुलढाणा-राजूर घाटात घडला. एसटी.बसचे ब्रेक ऐन राजूर घाटातील देवीच्या मदीरासमोर निकामी झाल्याने बस पलटी होवून त्यामध्ये 8 प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून त्यांची तब्येत चांगली आहे. बस चालकाच्या प्रसंगवधाने मोठा अनर्थ टळला.

बुलढाणा येथून दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास जामनेर डेपोची एम.एच.40 एन-9097 ही बस चालक लोखंडे हे निघाले होते. बसमध्ये 29 प्रवाशी होते. राजूर घाटात देवीच्या मंदीरासमोरील वळणावर बसचे अचानक ब्रेक निकामी झाल्याचे चालक लोखंडे यांच्या लक्षात येताच त्यांनी दरीकडे वळत असलेली बस पहाडाकडे वळविली. परंतु यावेळी बस पहाडाला धडकल्याने मोठा अनर्थ टळला, मात्र बस पलटी झाल्याने बसमधील गंगाराम सुखदेव वाघ (वय 84), सौ.लताबाई गावंडे (वय 35), अरुण वाघ (वय 52), इंदुबाई वाघ (वय 45) सर्व रा.दे.गुजरी ता.जामनेर, श्रीकृष्ण जाधव (वय 75) रा.नांद्रा हवेली ता.जामनेर, मधूकर जाधव (वय 76) रा.लोणी ता.जामनेर, शेषमन राठोड (वय 66) रा.घाणेगाव ता.सोयगाव, अशोक पाटील(वय 65) रा.मांडवे बु.ता.जामनेर हे जखमी झाले होते. यातील काही प्रवाशी आपल्या घरी सुखरुप पोहचले तर काही नातेवाईकांकडे मुक्कामी असल्याची माहिती जखमी झालेल्या प्रवाश्यांच्या नातेवाईकांनी ‘बुलडाणा न्यूज अपडेट’ शी बोलतांना दिली.