विविध न्याय्य मागण्यांसाठी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे जिल्हा कचेरीसमोर एक दिवशीय धरणे आंदोलन !

295

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (24 FEB.2023) अन्यायाविरुध्द आंदोलन उभारण्याचे प्रत्येकाला अधिकार आहेत. कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा बुलढाणा यांच्यावतीने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्यात यावे तसेच पदोन्नती व सरळ सेवतेतील अनुशेष तात्काळ भरण्यात यावा, यासह आदी मागण्यांसाठी आज 24 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हातामध्ये मागण्यांचे फलक घेवून एकदिवशीय धरणे आंदोलन करुन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांना निवेदन दिले.

महाराष्ट्र शासनाने सन २०१७ पासून शासकोय सेवेतील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीमधील आरक्षण बंद केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण नाकारता येणार नाही, असे स्पष्ट आदेश सन २०१८ ला राज्य शासनाला दिले आहेत. परंतु याबाबत राज्य शासनाने पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्यामुळे राज्यातील सर्व मागासवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. शासनाच्या पदभरतीमधील आऊटसोसिंग धोरणामुळे मागासवर्गीयांचा पदोन्नती ब सरळ सेवेतील अनुशेष वाढत असून पदोन्नती व सरळ सेवेतील आऊटसोर्सिंग धोरण रद्द करुन अनुशेष तात्काळ भरण्यात यावा, जुनी पेंशन योजना २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना शासनाने नाकारली आहे. त्याच्या जागी नविन अन्यायकारक पेशन योजना मंजूर करुन या कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधकारमय केल्याचा आरोप निवेदनात केला आहे. याउलट राजस्थान, हिमाचल प्रदेश आनि पंजाब सारख्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. महाराष्ट्र शासनानेही त्वरीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागण्यांसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महराष्ट्र राज्य जिल्हा शाखा बुलढाण यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले, या आंदोलनामध्ये संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अविनाश वाकोडे, जिल्हाध्यक्ष सुभाष डोंगरदिवे, म.रा.मुख्य संघटन सचिव बी. डी. धुरंधर, आय.टी.इंगळे, शेषराव वाकोडे, अशोक हिवाळे, अरुण सावंग, डी.एस.गवई, जी.एस.वाघ, प्रकाश बोंडे, कैलास तेलंग यांच्यासह आदी सहभागी झाले होते.