जिल्ह्यातील 8 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; खामगाव शहर ठाणेदारपदी शांतीकुमार पाटील

589
शांतीकुमार पाटील

शेगाव ग्रामीणला मिळाले पोलिस निरीक्षक

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (25 FEB.2023) बुलढाणा जिल्हा पोलिस दल आस्थापना मंडळाची बैठक 24 फेब्रुवारी रोजी आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीमध्ये महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 अन्वये प्रख्यापीत पोलिस सुधारणा अध्यादेश 2015 मधील कलम 22 (न) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करुन जिल्हा पोलिस अधिक्षक सारंग आवाड यांनी जिल्ह्यातील 8 पोलिस निरिक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरुपात बदल्या करण्यात आल्या आहेत.

खामगाव शहर पोस्टे.पोलिस निरिक्षक प्रदीप त्रिभुवन यांची जिल्हा विशेष शाखा बुलढाणा, सुरक्षा शाखा बुलढाण्याचे पोलिस निरिक्षक दिलीप वडगावकर यांची शेगाव ग्रामीण पोस्टे.ठाणेदारपदी, एमआयडीसी पोस्टे.मलकापूर ठाणेदार पोलिस निरिक्षक आनंद महाजन यांची प्रभारी अधिकारी, जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा बुलढाणा, जि.वा.नि.शा.बुलढाणा पोलिस निरिक्षक शांतीकुमार पाटील यांची खामगाव शहर ठाणेदारपदी, नियंत्रण कक्ष बुलढाणा पोलिस निरिक्षक सारंगधर नवलकार यांची मलकापूर एमआयडीसी ठाणेदारपदी, पोलिस निरिक्षक अनिल पाटील यांची प्रभारी अधिकारी पोस्टे.सायबर, नियंत्रण कक्ष बुलढाणाचे पोलिस निरिक्षक बाळकृष्ण पावरा यांची कल्याण शाखा बुलढाणा, कल्याण शाखा बुलढाणाचे पोलिस निरिक्षक गिरीश ताथोड यांची सुरक्षा शाखा बुलढाणा येथे प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली, तसे आदेश 24 फेब्रुवारी जिल्हापोलिस अधिकारी सारंग आवाड यांनी पारित केले आहे.