दारुड्या नवऱ्याचा त्रास असाह्य झाल्याने;खैऱ्यात 22 वर्षीय विवाहितेने गळफास घेतला !

545

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (31.May.2023) विवाहिता आपल्या आई-वडिल, भाऊ, बहिणींना सोडून सासरी येते, तेथे तिच्या जीवाभावाचा एकच असतो तो म्हणजे ‘नवरा’ परंतु नवऱ्याचाच त्रास असाह्य झाल्याने एका 22 वर्षीय विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची दुदैवी घटना 30 मे च्या रात्री खैरा ता.नांदुरा येथे घडली. भावाच्या फिर्यादीवरुन दारुड्या पतीस अटक करण्यात आली आहे.

विवाह हा प्रत्येक स्त्री च्या जीवनातील एक सुखद क्षण असतो, मुली आपल्या भावी संसाराचे स्वप्न रंगवित असतात. परंतु त्यांच्या नसीबात काय असते हे त्यांना माहितीसुध्दा नसते. अशीच एक घटना बोराखेडी पोस्टे.अंतर्गत असलेल्या खैरा ता.नांदुरा येथे घडली. 22 वर्षीय विवाहितेने नवरा दारु पिऊन त्रास देतो, तो त्रास असाह्य झाला आणि त्या त्रासाला कंटाळून हर्षा दिपक मानकर हीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना खैरा येथे 30 मे च्या रात्री उघडकीस आली. याबाबत बोराखेडी पोस्टे.ला विवाहितेच्या भाऊ गजानन शित्रे पाटील रा.मडाखेड ता.जळगाव जामोद यांनी पतीच्या त्रासाला कंटाळून बहीण हर्षा मानकरने आत्महत्या केल्याच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी आरोपी पती दिपक मनोहर मानकर याच्यावर भादंवीचे कलम 498, (अ), 306 अन्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.