युवकाची गळफास घेवून आत्महत्या

58

चिखली-कोणाला केंव्हा मृत्यू येईल, कोण केंव्हा जीवन संपवेल हे कोणीही सांगू सांगत नाही. असाच एक प्रकार चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथे घडला. अठरावर्षीय युवकाने रोजगार मेळाव्यातील अपयश जिव्हारी लागल्याने आज 9 सप्टेंबर रोजी 6 वाजेच्या सुमारास झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची दुदैवी घडना उघडकीस आली. मृतकाचे नाव अमरदीप अंबादास मोरे असे आहे.

आयटीआय करुन रोजगाराच्या अमरदीप मोरे हा नोकरीच्या शोधात होता. बुलढाणा येथील रोजगार मेळाव्यात रोजगार मिळेल या आशेने तो 7 सप्टेंबर रोजी मेळाव्यामध्ये सुध्दा आला होता. परंतु मेळाव्यातील पेपरामध्ये निराशा पदरी आल्याने तो हताश झाला होता. दुसऱ्या दिवशी तो मेळाव्यात गेलाच नव्हता. नोकरी न मिळाल्याने अमरदीप पुरता हताश झाला होता. अश्यातच त्याने आज त्याच्याच शेतातील झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. तो आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याच्या जाण्याने संपूर्ण अंत्री खेडेकर गावावर शोककळा पसरली आहे.