क्रुझर व मॅझीमोची धडक ; 1 ठार, 2 गंभीर

59

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा-(9.Sep.2023) बुलढाणा मलकापूर रोडवर वाधजाळ फाट्याजवळ क्रुझरने छोटा हत्ती वाहनाला धडक दिली. धडक एवढी भिषण होती की, यामध्ये मॅझीमोमधील 1 जण ठार तर 2 जण गंभीर झाल्याची घटना आज 9 सप्टेंबर रोजी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेवून दोन्ही वाहने बाजुला करुन वाहतूक सुरुळीत केली.

प्राप्त माहितीनुसार रोहिणखेड येथील कलीम कमा कुरेशी व इतर दोघे आपल्या एम.एच.48 टी-9553 या मॅझीमोने वाघजाळ फाटा येथे सुरत येथून येणारा साड्यांचा माल घेण्यासाठी गेले होते. गाडी येण्यास वेळ असल्याने ते पेट्रोल भरण्यासाठी जात असतांना त्यांच्या वाहनाला परडा फाट्यावर आज शनिवार 9 सप्टेंबर रोजी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास क्रुझर क्र.एम.एच.21 बीएफ-48 टी-9553 वाहनाने जबर धडक दिली. या धडकेत मॅझीमोमधील कलीम कमा कुरेशी (वय -32) यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाल्याने एका जणाला बुलढाणा तर दुसऱ्याला छत्रपती संभाजीनगर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मॅझीमो व क्रुझर बोराखेडी पोस्टे.ला जमा करण्यात आली. वृत्तलिहेपर्यंत बोराखेडी पोस्टे. फिर्याद दाखल नव्हती.