आडविहीर येथे शेतात हागायला बसल्याच्या जाब विचारल्याने वृध्दाला मारहाण !

55

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (29 Aug.2023) एकीकडे मोताळा तालुका कागदोपत्री शंभरटक्के हागणदारीमुक्त झाल्याचा डांगोरा पिटल्या जाते. तर दुसरीकडे शेतात हागल्याचा जाब विचारल्याने आडविहीर येथे दोघांनी 60 वर्षीय वृध्दाला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना 28 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली. वराडे यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसात दोघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माधव वसंत वराडे रा.आडविहीर यांनी बोराखेडी पोलिसात फिर्यादी दिली की, ते त्यांच्या शेतात काम करण्यासाठी गावातील मजूर घेवून गेले असता, एकजण तेथे हागायला बसलेला होता. त्याला शेतात मजूर निंदायला येत असतात तू शेतात हागायला बसत जावू नको, असे विचारले असता थोड्या वेळाने शेतात हागायला बसणारा निघून गेला, थोड्या वेळाने तेथे आणखी एका जणाला घेवून हातात लाकडी काठ्या घेवून येत शिविगाळ करुन काठ्यांनी डोक्यावर, डावा हात व डाव्या पायावर मारहाण करुन करुन जखमी केले. माधव वराडे यांची फिर्याद व मेडीकल रिपोर्टवरुन ‘त्या’ दोघा आरोपीवर बोराखेडी पोस्टे.ला भादंवीचे कलम 324, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बिट अंमलदार नापोकॉ.अमोल खराडे हे करीत आहेत.