मराठा आरक्षण व गृहमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्यासाठी मोताळ्यात मराठ्यांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरुच!

61

राजकीय पक्ष व विविध संघटनांच्या वाढत्या पाठींब्याने उपोषणकर्त्यांचे होसले बुलंद !!

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा-(9.Sep.2023) प्रत्येकाला अन्यायविरुध्द आवाज उठविणे, न्याय्य हक्कांसाठी आंदोलन व उपोषण करण्याचा अधिकार संविधानाने दिलेल्या आहे. परंतु मराठा द्वेषी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना जिल्ह्यातील अंतरावाली सराटी येथे मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी सुरु केलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या शांततामय मार्गाने चाललेल्या आंदोलनस्थळी पोलिसांनी बेछूट गोळीबार व लाठीहल्ला करुन अनेकांना जखमी केले. गृहमंत्री फडणवीस यांचा राजीनामा व आरक्षण यासाठी जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ मोताळा येथे सुनिल कोल्हे, रावसाहेब देशमुख, अमोल देशमुख, शुभम घोंगटे, निलेश सानुने, ओमप्रकाश बोर्डेसह समाज बांधवांनी डॉ.महाजन हॉस्पीटलसमोर 8 सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. ते उपोषण आज शनिवार 9 सप्टेंबर दुसऱ्या दिवशीही सुरुच होते. या उपोषणाला विविध संघटना व राजकीय पक्षांनी भेटी देवून जाहीर पाठींबा दिला आहे.

या उपोषणाला काँग्रेसच्या म.रा.सचिव जयश्रीताई शेळके, आ.राजेश एकडे, राजर्षी शाहू परिवाराचे संदीपदादा शेळके, मुस्लीम शहा फकीर समाज संघटनेचे के.जी.शहा, लुकमान शहा, वंचितचे अशोकभाऊ सोनोने, निलेश जाधव, प्रशांत वाघोदे, समतेचे निळे वादळ सामजिक संघटना अध्यक्ष अशांतभाई वानखेडे, सुधाकर सोनवणे, अरुणभाऊ डोंगरे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर, काँग्रेस कमिटीचे राज्य उपाध्यक्ष विजय अंभोरे, आंबेकर, जिजाऊ बिग्रेड, स्वाभिमानी शेतकरी संघटना, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विदर्भ खांदेश मातंग परिवर्तन संघटना, वंचित बहुजन आघाडी, गवळी समाज सेवा, उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत, नरेंद खेडेकर, राकाँ.चे संतोष रायपुरे, दामोधर शर्मा, रशीद खाँ जमादार यांच्यासह आदी मान्यवरांनी मोताळा येथील सकल मराठा समाजाच्या उपोषणस्थळी भेट देवून आपला पाठींबा जाहीर केला आहे. वाढता पाठींब्याने समाज बांधवांचे मनोधैर्य वाढले असून मागण्या मान्य झाल्याशिवाय आता माघार नाही, असा आक्रमक पवित्रा समाज बांधवांनी घेतला आहे.