मोताळा येथे युवकाची आत्महत्या

71

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (10.Sep) येथील आयटीआय कॉलेज मध्ये शिकणाऱ्या चिखली तालुक्यातील अंबाशी येथील एका 21 वर्षीय युवकाने पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली. सदर घटना आज 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मृतक युवकाचे नाव आदीत्य वसंतराव देशमुख असे आहे.

आदीत्य देशमुख हा मोताळा येथील बसस्टॅण्ड परिसरात सुभाष कुटे यांच्या घरामध्ये भाड्याने राहत होता. तो येथील आयटीआय कॉलेजमध्ये शिकत होता. आज रविवार 10 सप्टेंबर रोजी आदीत्यने सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घरातील दुसऱ्या खोलीत पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केल्याची दुदैवी घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोस्टे.चे एपीआय राजवंत आठवले, पोकाँ. अमोल खराडे यांनी घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पोलिस प्रशासनाने मृतक युवकाच्या नातेवाईला माहिती दिली असून ते मोताळा येथे पोहचणार आहेत. त्यानंतर प्रेत शवविच्छेदनासाठी बुलढाणा येथे पाठविण्यात येणार येइल. आदीत्यने आत्महत्या का केली, याचे कारण मात्र समजू शकले नाही.