निवडणूका पार्श्वभूमी; जिल्ह्यात 28 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा उडाला बार !

89

बोराखेडी ठाणेदारपदी आता सायबरचे सारंग नवलकार

बुलढाणा-(16 Jan-2024)खरंच हा योगायोग, पहिले स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरिक्षक बळीराम गिते यांची बोराखेडी ठाणेदारपदी बदली करण्यात आली होती. आता आगामी काळात होवू घातलेल्या लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 10 पोलिस निरिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या, यामध्ये बोराखेडी ठाणेदारपदी सायबरचे पोलिस निरिक्षक सारंग नवलकार यांची बदली करण्यात आली, तेही ऐन तिळ संक्रातच्या दिवशीच म्हणजे ‘तिळ गूळ घ्या, अन् गोड गोड बोलाचं’ हे विशेष…! नवलकार यांची सायबरची धडक कारवाई पाहता, आता बोराखेडी पोस्टे.मध्ये दाखल गुन्ह्याची गुंथ्थी सोडविण्यास ते सक्षक ठरतील, असे म्हटल्यास वावगे ठरु नये !

लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने पोलिस महासंचालक मुंबई यांच्या आदेशान्वये बुलढाणा जिल्हा पोलिस घटकातील पात्र निशस्त्र पोलिस निरिक्षकांच्या बदल्याबाबत निर्णय घेवून जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी दहा पोलिस निरिक्षक, सात सहाय्यक पोलिस निरिक्षक व अकरा पोलिस उपनिरिक्षक यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये ज.जामोद पोस्टे.पोलिस निरिक्षक दिनेश झांबरे यांची नियंत्रण कक्ष बुलढाणा, जिल्हा वाहतूक शाखेचे आनंद महाजन यांची ज.जामोद , बोराखेडी येथील बळीराम गिते यांची सुरक्षा शाखा बुलढाणा, सायबर पोस्टे.चे पोलिस निरिक्षक सारंग नवलकार यांची बोराखेडी, बुलढाणा शहर पोस्टे.ठाणेदार प्रल्हाद काटकर यांची सायबर बुलढाणा, खामगाव शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे बुलढाणा शहर ठाणेदारपदी, तामगाव ठाणेदार प्रमोद उलेमाले यांची नियंत्रण कक्ष बुलढाणा, शेगाव शहरचे सुनिल अंबुलकर यांची गजानन महाराज मंदीर सुरक्षा शेगाव येथे तर तेथील सुरेश नाईकनवरे नियंत्रण कक्ष खामगाव येथे बदली करण्यात आली.

मलकापूरच्या डॅशींग स्मीता म्हसाये बोराखेडी येथे

मलकापूर शहर पोस्टे.चे सहाय्यक पोलिस निरिक्षक राजेंद्र पवार यांची तामगाव ठाणेदारपदी, मलकापूर शहर स्मीता म्हसाये यांची बोराखेडी, शिवाजीनगर पोस्टे.चे द्वारकानाथ गोंदके यांची मलकापूर शहर, चिखली पोस्टे.चे गजानन वाघ नियंत्रण कक्ष बुलढाणा, शिवाजीनगरचे समाधान रिठे कोर्ट पैरवी अधिकारी बुलढाणा, शेगाव शहरचे श्रीकांत इंगोले यांची नियंत्रण कक्ष बुलढाणा, नियंत्रण कक्ष बुलढाणाचे नंदकुमार आयरे यांची शेगाव शहर येथे बदली करण्यात आली.

बोराखेडीचे अनिल भुसारी आता जिविशा.बुलढाणा येथे

साखरखेर्डा पोस्टे.येथील पोलिस उपनिरिक्षक गजानन मुंढे यांची वाचक उपवि.पो.अ.बुलढाणा, दोषसिध्दी विभाग बुलढाणा गोकुळसिंग राठोड यांची बुलढाणा ग्रामीण, बोराखेडी येथील अनिल भुसारी जिविशा.बुलढाणा, बुलढाणा शहर दिलीप पवार दोषसिध्दी विभाग बुलढाणा, जानेफळ माधव पेटकर वाचक उपवि.पो.अ.मेहकर, राहूल चव्हाण उपवि.पो.अ.मेहकर यांची जानेफळ, राजाभाऊ घोगरे लोणार यांची नियंत्रण कक्ष बुलढाणा, शेगाव शहरचे राहुल कातकाडे ज.जामोद, किनगाव राजा गजानन केदार नियंत्रण कक्ष बुलढाणा, मेहकरचे सय्यद हारुण यांची जिवाशा.बुलढाणा, तामगावचे दिपक सोळंके यांची जिल्हा विशेष शाखा बुलढाणा येथे बदली करण्यात आली आहे.