मोताळा तालुक्यात अवकाळीचे थैमान; 19 हेक्टर क्षेत्रावरील पिके झाली उध्दवस्त

374

1)राजूर, खडकी, खामखेड, कोऱ्हाळा बाजार येथील 42 शेतकऱ्यांचे नुकसान
2)आडविहीर येथे भिंत कोसळली;सुदैवाने जिवीतहानी टळली

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा(8 Apr.2023) शेतीला लावलेला खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडून मोठा प्रमाणात कर्जबाजारी होत असल्यामुळे गळफास घेवून आपली जिवनयात्रा संपवित आहे. शुक्रवार 7 एप्रिलच्या सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मोताळा तालुक्यात हजेरी लावल्यामुळे 19 हेक्टरवरील क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तसेच आडविहीर येथे दोन घरांच्या भिंती कोसळून त्यामध्ये 1 लाख 20 हजाराचे नुकसान झाले, सुदैवाने जिवीतहानी टळली.

मोताळा तालुक्यात शुक्रवार 7 एप्रिलच्या सायंकाळी 5 ते 7 वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे राजूर, खडकी, खामखेड, कोऱ्हाळा बाजार येथील शेतकऱ्यांच्या गहू, मका, कांदा, ज्वारी व भाजीपाल्याचे पीके उध्दवस्त होवून त्यामध्ये 42 शेतकऱ्यांचे 19 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले तर आडविहीर येथे अनिल हरी खाचणे व सुनिता खाचणे यांच्या घरावरील टिनपत्रे उडून भिंत कोसळली, सुदैवाने जिवीतहानी टळली. यामध्ये अनिल खाचणे घरातील अन्नधान्य, भांडे असे 55 हजाराचे तर सुनिता खाचणे यांचे 65 हजाराचे नुकसान झाले आहे. घटनास्थळाचा पंचनामा करुन तलाठी एन.एस.देवकर यांनी तहसिल प्रशासनाला अहवाल पाठविला आहे.